Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : सावधान : राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ

Spread the love

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासात 3,378 रुग्णांनाच डिस्चार्ज मिळाला आहे. तर 9,336 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या आता एक लाख 23 हजारांवर गेली आहे. दरम्यान आज मालेगाव आणि गोंदियामध्ये एकही रुग्ण आढळून आला नाही. तर कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक 1461 तर कोल्हापूर शहरात 389 असे एकूण 1850 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. सांगलीचा आकडाही हजारांच्या वर नोंदवला आहे.


राज्यात काल 8,395 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला होता तर 9,489 नवीन रुग्णांची नोंद झाली होती. आजपर्यंत 58,48,693 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 95.91 टक्क्यांवर गेला आहे.तर राज्यात आज 123 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून राज्याचा मृत्यूदर 2. 01 टक्के आहे. सध्या राज्यात 1,23,225 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,25,42,943 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 60,98,177 (14.33 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6,38,004 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,198 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबई कोरोना एक नजर

मुंबईत गेल्या 24 तासात 548 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 705 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 6,98,696 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 8,114 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 767 दिवसांवर गेला आहे.

पुणे कोरोना एक नजर

पुणे शहरात आज नव्याने 316 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता 4 लाख 79 हजार 732 इतकी झाली आहे.शहरातील 329 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 68 हजार 337 झाली आहे.पुणे शहरात आज एकाच दिवसात 5 हजार 734 नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 26 लाख 93 हजार 608 इतकी झाली आहे.पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 2 हजार 783 रुग्णांपैकी 297 रुग्ण गंभीर तर 439 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने 6 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 8 हजार 612 इतकी झाली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!