Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PoliticalNewsUpdate : हास्यास्पद प्रयोग , भाजपची शरद पवारांच्या दिल्लीतील बैठकीवर टीका

Spread the love

मुंबई :  कालपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी होत असलेल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीची माध्यमातून चर्चा आहे. दिल्लीत गेल्यानंतर शरद पवार यांनी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची भेट घेतली. त्यानंतर ही बैठक होत असून, या बैठकीवरून भाजपाने चिमटा काढला आहे. शरद पवार यांच्या घरी होत असलेल्या बैठकीत उपस्थित असणाऱ्यांची यादी पाहिली, तर राजकारणात जनाधार गमावलेल्या नेत्यांचा केवळ बातमीत राहण्यापुरता केविलवाणा प्रयत्न असल्याचा टोला भाजपाने लगावला आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ‘राष्ट्रमंच’च्या बॅनरखाली विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक होत आहे. या बैठकीला काँग्रेस व शिवसेना वगळता इतर विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहे. या बैठकीवर भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत निशाणा साधला आहे. या बैठकीत सहभागी होणाऱ्या काही नेत्यांची नावंही उपाध्ये यांनी घेतली आहेत.
त्यांनी दिलेल्या या यादीत  1) यशवंत सिंन्हा 2) पवन वर्मा 3) संजय सिंग 4) डी.राजा 5) फारुख अब्दुला 6) जस्टीस ए. पी.शाह 7) जावेद अखतर 8) के सी तुलसी 9) करन थापर 10) आशुतोष 11)माजीद मेमन 12) वंदना चव्हाण 13) एस वाय कुरेशी (Former CEC) यांची नवे दिलेली असून त्यांनी म्हटले आहे कि , “शरद पवार यांच्या दिल्लीतील घरी बैठक… २० जण उपस्थित असणाऱ्यांची यादी पहाता संभाव्य आघाडी हा राजकारणात जनाधार गमावलेल्या नेत्यांचा केवळ बातमीत राहण्यापुरता केविलवाणा प्रयत्न असून, एक नवा हास्यास्पद प्रयोग यापलीकडे त्यातून काही निष्पन्न होणार नाही. ”

आपलं सरकार

Click to listen highlighted text!