Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaNewsUpdate : कोरोनापासून वाचायचे असेल तर हे गांभीर्याने घ्या…

Spread the love

नवी दिल्ली  : कोरोना काळात नियमावलीकडे नागरिकांचे दुर्लक्ष होत असल्याने देशात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे निदर्शनास येत असून त्यामुळेच देशाची स्थिती  दिवसेंदिवस गंभीर होत आहे . सामाजिक आणि राजकीय सोहळ्यांना झालेली गर्दी आणि मास्क वापरण्याबाबतचा बेफिकीरपणा यातून  कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षाही दुसऱ्या लाटेमुळे चिंताजनक  परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांनी कोरोनाच्या नियमांना गांभीर्याने घेतले नाही तर भारतातील मृत्यूचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढू शकतो असा इशारा वॉशिंग्टन विद्यापीठातर्फे देण्यात आला आहे.

देशात दररोज तीन लाखांहून अधिक नागरिक पॉझिटिव्ह आढळून येत असून, वाढत्या मृत्यूची संख्येने  काळजी भर टाकली आहे. देशात मागील काही दिवसांपासून दोन हजारांहून अधिक मृत्यूंची नोंद होत आहे, असे  असतानाच अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठाने काळजाचा ठोका चुकवणारा इशारा दिला आहे. देशात मे महिन्याच्या मध्यावधीत दररोज ५ हजाराहून अधिक मृत्यू होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

कोरोनाच्या वेगवेगळ्या स्ट्रेनमुळे भारतात करोना संसर्गचा वेग प्रचंड वाढला आहे. दररोज तीन लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत असून, वाढत्या रुग्णसंख्येपाठोपाठ आता मृत्यूंचा आकडाही वाढू लागला आहे. देशात मागील काही दिवसांपासून दोन हजारांहून अधिक करोना मृत्यूची नोंद होत आहे. त्यात आता वॉशिंग्टन विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अॅण्ड इव्हॅल्युशनने ((IHME) चिंता वाढवणारा इशारा दिला आहे.

इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अॅण्ड इव्हॅल्युशनने कोविड-१९ प्रोजेक्शन शिर्षकाखाली एक अभ्यास केला. या अभ्यासाचा अहवाल १५ एप्रिल रोजी प्रसिद्ध झाला असून, अभ्यासात दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यात लसीकरणावर आशा व्यक्त करण्यात आलेली आहे. कोरोनाच्या आपत्तीमुळे भारतातील परिस्थिती पुढील काही आठवड्यात आणखी वाईट होईल, असा इशारा इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अॅण्ड इव्हॅल्युशनने अभ्यासाच्या आधारे दिला आहे. तज्ज्ञांनी भारतातील सध्याचा संसर्गाची आणि मृत्यू सरासरी यांचाही अभ्यास केला आहे.

इन्स्टिट्यूटने चालू वर्षात भारतात करोना मृत्यूसंख्या शिखरावर पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. १० मे रोजी भारतात ५ हजार ६०० जणांचा करोनामुळे मृत्यूची होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, १२ एप्रिल ते १ ऑगस्ट या कालावधीत देशात ३ लाख २९ हजार जणांचा करोनामुळे मृत्यू होऊ शकतो. तसेच जुलै अखेरीपर्यंत एकूण ६ लाख ६५ हजार मृत्यू होऊ शकतात, असंही इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अॅण्ड इव्हॅल्युशनने अभ्यासात म्हटलं आहे.

मास्क वापरण्याचा सल्ला 

या संस्थेच्या निष्कर्षात मास्कच्या वापराबद्दलही अभ्यासात काही निष्कर्ष मांडण्यात आले असून लोकांनी मास्क वापरला तर  एप्रिलच्या अखेरीपर्यंत हा आकडा ७० हजारांपर्यंत कमी होऊ शकतो. यामुळेच सप्टेंबर २०२० च्या मध्यानंतर फेब्रुवारीच्या मध्यावधी पर्यंत करोना रुग्णसंख्या आणि मृत्यूमध्ये घसरण होत होती. मात्र एप्रिलमध्ये लोकांच्या बेफिकिरीमुळे यात अचानक यात वाढ झाली. यामध्ये पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णसंख्या ७१ टक्क्यांने वाढली आणि दररोज होणारे मृत्यू ५५ टक्क्याने वाढले. करोना नियमावलीचे  पालन न केल्याने , सोहळ्यांना झालेली गर्दी आणि मास्क वापरण्याप्रति  नागरिकांच्या उदासीनतेमुळेच  ही वाढ झाल्याचे  संस्थेनं म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!