Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : रजनीकांत यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार

Spread the love

नवी दिल्ली : प्रसिद्ध सिनेस्टार  रजनीकांत यांना सिनेसृष्टीतील सर्वोच्च समजला जाणार दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. आज केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याची घोषणा केली आहे. 51 वा दादासाहेब फाळके पुरस्काराने 3 मे रोजी रजनीकांत यांचा गौरव करण्यात येणार आहे.

दादासाहेब फाळके पुरस्कार आतापर्यंत चित्रपटातील उल्लेखनीय योगदानाबद्दल 50 सेलिब्रिटींना देण्यात आला आहे. आता 51 वा पुरस्कार सुपरस्टार रजनीकांत यांना देण्यात येणार आहे. रजनीकांत गेली पाच दशके सिनेमा जगतावर राज्य करत आहेत आणि लोकांचे मनोरंजन करत आहेत, म्हणूनच यावेळी दादासाहेब फाळके पुरस्काराच्या ज्युरींनी रजनीकांत यांच्या नावाची एकमताने शिफारस केली, असे  प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं.

रजनीकांत यांनी वयाच्या 25 व्या वर्षी फिल्मी करिअरची सुरुवात केली. त्यांचा पहिला तमिळ चित्रपट ‘अपूर्वा रागनगाल’ हा होता. या सिनेमात त्यांच्यासोबत कमल हासन आणि श्रीविद्या हे देखील होते. 1975 ते 1977 दरम्यान त्यांनी बहुतेक चित्रपटांमध्ये कमल हसनसोबत खलनायकाची भूमिका केली. मुख्य भूमिकेत ‘भैरवी’ हा त्यांचा पहिला तमिळ चित्रपट होता. चित्रपट हिट ठरला आणि तिथून रजनीकांत यांचा सुपरस्टार पर्यंतचा प्रवास सुरु झाला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!