Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

NandedNewsUpdate : शीख समाजाच्या हल्ला मोहल्ला कार्यक्रमाला परवानगी न दिल्याने पोलिसांवर सशस्त्र हल्ला

Spread the love

नांदेड : नांदेड येथे शीख समाजाच्या हल्ला मोहल्ला कार्यक्रमाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परवानगी नाकारल्यामुळे संतप्त शीख समाजातील तरुणांनी पोलिसांवरच सशस्त्र हल्ला केला आहे . या हल्ल्यात १० पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून ४ जण अत्यवस्थ आहेत. तसेच  पोलीस अधीक्षकांच्या वाहनासह सात वाहनांची दंगेखोरांनी नासधूसही  केली आहे. पोलीस अधीक्षक यांचे दोन गार्ड या दंगलीत जखमी झाले असल्याचे वृत्त आहे.


शीख समाजात होळी या सणाला मोठे महत्त्व आहे. त्यानिमित्त शीख समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणात दरवर्षी हल्ला बोलची मिरवणूक काढण्यात येते. परंतु, यावर्षी कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्यामुळे लॉकडाऊन लावण्यात आला आहे. नांदेडमध्ये लॉकडाऊन असल्याने होळीनंतर निघणाऱ्या शिख समाजाच्या हल्लाबोल मिरवणुकीला परवानगी नव्हती. तसेच संबंधित हल्ला मोहल्ला कार्यक्रम हा पूजा अर्चा करून साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते व त्यास शीख धर्मियांच्या बाबाजींनी सकारात्मक प्रतिसादही देण्यात आला होता. मात्र, या दरम्यान सोमवारी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास भाविक गुरुद्वारामध्ये मोठ्या प्रमाणात जमा झाले. त्यातील काही तरुणांनी सदर हल्ला मोहल्ला कार्यक्रमात पोलीस प्रशासनाला न जुमानता पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढली.

यावेळी मिरवणुकीस प्रतिबंध करण्यासाठी गुरुद्वारा चौरस्त्यावर पोलीस तैनात होते. चौरस्त्यावर बॅरिकेटिंग करण्यात आली होती. या दरम्यान हल्ला मोहल्ला कार्यक्रमातील तरुणांनी पोलीसांशी हुज्जत घातली व हल्ला चढवून गंभीर जखमी केले. एवढेच नाही तर पोलीस अधीक्षकांच्या गाडीसह पोलिसांच्या इतर सात वाहनांची नासधूस व तोडफोड केली. तर काही माथेफिरू लोकांनी बॅरिकेटिंगही तोडली. त्यामुळे तणाव निर्माण झाला.

सध्या परिस्थीती नियंत्रणात असली तरी संपूर्ण परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे. नांदेडमध्ये दररोज कोरोनाचे एक हजारहून अधिक रुग्ण आढळत असून 17 ते 18 जणांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे गुरुवारपासून टाळेबंदी करण्यात आली आहे. परंतु, त्यानंतरही आज शीख समाजाच्यावतीने हल्लाबोल मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी पोलिसांनी प्रतिबंध केल्यानंतर पोलिसांवर हल्ला करण्यात आला. त्यात 10 पोलीस जखमी झाले. संतप्त जमावाने पोलीस उपअधीक्षक यांची गाडीही फोडली. चौरस्त्यावर घटनेचे शूटिंग करणाऱ्या अनेकांचे मोबाइल यावेळी फोडण्यात आले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!