Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

NandedNewsUpdate : जि. प . मुख्याधिकारी वर्षा ठाकूर यांच्यासह अनेक अधिकारी कोरोनाबाधित 

Spread the love

नांदेड : नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी ६९५ कोरोनाबाधित नवे रुग्ण आढळले असून नांदेड जिल्हा परिषदेच्या सीईओ वर्षा ठाकूर यांना करोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बुधवारी रात्री शहरातील सर्व दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु तरीही संसर्ग अटोक्यात येत नसल्याचे  चित्र आहे. आता तर, जिल्हा अधिकाऱ्यांनाच करोनाने  गाठले आहे. वर्षा ठाकूर यांनी दोन दिवसांपूर्वी अँटीजन टेस्ट केली होती. मात्र ती टेस्ट निगेटिव्ह आली होती. त्यानंतर केलेल्या आरटीपीसीआर चाचणीचे आज अहवाल आला आहे. त्यानुसार ठाकूर यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. ठाकूर यांच्यासह अतिरीक्त सीईओ शरद कुलकर्णी, कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे यांच्यासह अनेकांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे  जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान  नांदेड जिल्हा करोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. जिल्हा परिषदेच्या प्रमुख अधिकाऱ्यांनाच करोनाची लागण झाल्यानं आज जिल्हा परिषदेत शुकशुकाट पाहायला मिळाला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!