Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadLatestNewsUpdate : प्लास्टिक कंपनी आगीत जाळून खाक, करोडो रुपयांचे नुकसान

Spread the love

वाळूज औद्योगिक वसाहतीतील घटना, कुठलीही जिवीतहानी नाही….

औरंगाबाद येथील वाळूज औद्योगिक वसाहतीतील डी सेक्टरमध्ये प्लाँट क्र. डब्ल्यू 97 या भुखंडावरील एका कंपनीला मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागून संपूर्ण कंपनीची इमारत  जळून खाक झाली. मात्र कुठलीही जीवित हानी झाली नाही . उद्योजक अशोक थोरात यांच्या दर्शन ग्रुपची ध्रुवतारा नावाची कंपनी आहे. या कंपनीत व्हेरॉक  कंपनीसाठी लागणारे चारचाकी, तीनचाकी व दुचाकी या वाहनासाठी इंडीकेटर, लाईट, वायर  अशा प्लास्टिकच्या पार्टचे उत्पादन घेतले जाते. आगीचे कारण समजू शकले नाही. दुपारी १२ वाजेपर्यंत हि आग विझवण्याचे काम चालू होते.

बुधवारी (ता.3) कंपनी सुरू असताना भल्या पहाटे 2 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. दरम्यान ही घटना कामगारांच्या वेळीच लक्षात आली. यामुळे सर्व कामगारांनी बचावासाठी कंपनी बाहेर धाव घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र या घटनेत कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती स्थानिक एमआयडीसी वाळूज पोलीस आणि महानगरपालिका, गरवारे, बजाज, वाळूज अग्निशमन विभागाला कळताच पोलीस-जवानांनी घटनास्थळी धाव घेत सकाळपर्यंत आग विझवण्याचा प्रयत्न केला. या आगीत करोडो रूपयांचा कच्चा आणि पक्का माल जळून कोळसा झाल्याचे कंपनी मालक अशोक थोरात यांनी सांगितले.

११ तास धुमसत होती आग

या आगीची माहिती वाळूज येथील फायर ब्रिगेडला देण्यात आल्याने फायर ब्रिगेडचे अधिकारी के ए डोंगरे, एस आर गायकवाड हे बंबासह घटनास्थळी दाखल झाले. बराच वेळ शर्थीचे प्रयत्न करून सुद्धा आग आटोक्यात न आल्याने औरंगाबाद महानगरपालिका अग्निशमन दलाचे दोन फायर बंब, गरवारे आणि बजाज कंपनीचे फायर बंब आणि 3 खाजगी टँकर मागवण्यात आले. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून सुद्धा ही आग  दुपारी १२  वाजेपर्यंत आग विझवण्याचे काम चालू होते.

या  कंपनीत  12- 12 तास अशा दोन शिफ्ट मध्ये रात्रंदिवस सुरु असते. यात शकडो महिला व पुरुष कामगार काम करतात. या आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट असून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक आगीची नोंद करण्यात आली आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!