Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : उपनिरीक्षकाला लाच देणारा वाळू ठेकेदार अटकेत

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद : वाळूचे अवैद्य दोन टेम्पो चालवू देण्यासाठी देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात कार्यरत उपनिरीक्षकाला इच्छा नसताना २५ हजारांची लाच देणाऱ्या वाळू ठेकेदाराला एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई सोमवारी दुपारी साडे चारच्या सुमारास करण्यात आली. गोकुळ बाळासाहेब सूर्यवंशी (४०, रा.बळेगाव, ता.वैजापूर) असे अटकेतील वाळू ठेकेदाराने नाव आहे.

Advertisements

पोलीस उपनिरीक्षक शैलेश उद्धवराव जोगदंड हे देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात  कार्यरत आहेत. गोकुळ सूर्यवंशी हा वाळूची ठेकेदारी करतो. त्याने त्याचे दोन टेम्पो सुरू करण्यासाठी उपनिरीक्षक जोगदंड यांना इच्छा नसताना एका टेम्पोचा हप्ता म्हणून २५ हजारांची लाच देऊ केली. मात्र, जोगदंड यांनी याबाबत एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीच्या पथकाने मंगळवारी दुपारी सापळा लावून सूर्यवंशी याला रंगेहात पकडले. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अप्पर अधीक्षक अनिता जमादार, उपअधीक्षक आर.डी.निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली जालना एसीबीचे निरीक्षक एस.एस.शेख जमादार गणेश चेके, गजानन कांबळे, शेख जावेद, प्रवीण खंदारे यांच्या पथकाने केली.

Advertisements
Advertisements

महापालिकेच्या नागरी पथकाला मारहाण , गुन्हा दाखल होताच किशनचंद तनवाणी फरार

औरंगाबाद –  विनामास्क फिरणार्‍या विद्यार्थ्याला दंड आकारु नका असे म्हणंत महापालिका पथकाला मारहाण करणार्‍या दोघांना क्रांतीचौक पोलिसांनी अटक केली आहे तर एक आरोपी फरार आहे.सुरेंद्र कुलकर्णी आणि आतिश जोजारे अशी अटक आरोपींची नावे आहेत.तर या प्रकरणातील आणखी एक आरोपी किशनचंद तनवाणी फरार असल्याची माहिती क्रांतीचौक पोलिसांनी दिली.पुढील तपास पोलिस निरीक्षक डाँ.गणपत दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतीचौक पोलिस करंत आहेत

आपलं सरकार

Click to listen highlighted text!