Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

18 महिन्यांनंतर जम्मू – काश्मीरमध्ये 4G इंटरनेट सेवा सुरु होणार

Spread the love

जम्मू आणि काश्मीरमध्ये  काही घडामोडी आणि तणावाच्या परिस्थितीमुळे अनेकदा येथील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. तब्बल 18 महिन्यांनंतर येथील 4G इंटरनेट सेवा सुरु करण्यात आली आहे. जम्मू काश्मीर सरकारचे प्रवक्ते रोहित कंसल यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. अनुच्छेद 370 हटवल्यानंतरपासूनच या भागात 4G इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. ज्यानंतर आता ही सेवा पुन्हा बहाल करण्यात आली आहे.

दरम्यान, या भागात इंटरनेट सेवा सुरु करण्याची माहिती समोर आल्यानंतर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करत याबाबतचा आनंदही व्यक्त केला. “4G मुबारक! ऑगस्ट 2019 नंतर प्रथमच सर्व जम्मू-काश्मीरमध्ये 4G मोबाईल डेटा सुरू झाला आहे. “Better late than never”

ऑगस्ट 2019 नंतर पहिल्यांदाच जम्मू आणि काश्मीरमघ्ये 4G मोबाईल डेटा वापरता येणार आहे. असे म्हणत त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. 5 ऑगस्ट 2019ला केंद्र सरकारने जम्मू – काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणाऱ्या अनुच्छेद 370 रद्द करण्याचा निर्णय दिला. ज्यानंतर जम्मू काश्मीरची विभागणी दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये करण्यात आली. जम्मू – काश्मीर आणि लडाख असे हे केंद्रशासित प्रदेश त्या क्षणापासून उदयास आले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!