Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सीरम इन्स्टिट्यूटमधील इमारतीला आग…अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनस्थळी दाखल

Spread the love

कोरोना ‘कोव्हिशिल्ड’ लसीमुळे सध्या चर्चेत असणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमधील एका इमारतीच्या तिसर्या मजल्यावर आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १० गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारीदेखील घटनास्थळी रवाना झाले आहेत. सुदैवाने ‘कोव्हिशिल्ड’ लसीची निर्मिती होणारे ठिकाण सुरक्षित असल्याचे सीरमकडून सांगण्यात आले आहे.

कोव्हिशिल्ड लसीच्या वापरासाठी परवानगी देण्यात आलेली असून सध्या देशभरात लसीकरणास सुरु आहे. मांजरी येथील या ठिकाणी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी घेतली जाणारी बीसीजी लस तयार केली जाते. त्या विभागाला ही आग लागल्याचे वृत्त आहे. महत्वाचे म्हणजे करोनावरील ‘कोव्हिशिल्ड’ लस तयार केली जाते तेथून हा भाग काही अंतरावर आहे. सुदैवाने अद्याप आगीची झळ तिथपर्यंत पोहोचलेली नाही. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून मोठ्या प्रमाणात आगीचे लोट दिसत आहेत. यामुळे घटनास्थळी लोकांनी गर्दी केली आहे.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मधमांशी बोलताना म्हणाले की, इन्सिट्यूटच्या एका इमारतीला आग लागली आहे. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि प्रमुख अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही”. अग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळवत असून इमारतीत कोणते कर्मचारी अडकले आहेत का ? याचीही पाहणी करत आहेत. दरम्यान आजुबाजूला लोकवस्ती असल्याने आगीची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली आहे. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीदेखील झाली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

स्थानिक आमदार चेतन तुपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “सीरमची मांजरीत जी नवी इमारत उभारण्यात आली आहे त्याच्या एका बाजूला आग लागली आहे. अग्निशन आणि इतर यंत्रणा तिथे उपस्थित असून आगीवर नियंत्रण मिळण्याचा प्रयत्न सुरु आहे. लस तयार करणाऱ्या युनिटला कोणताही धोका नाही. आकाशवाणी परिसरातील जुन्या ठिकाणी लसीचे सर्व काम चालते. जीवितहानी झालेली कोणतीही माहिती नसून लस निर्मितीला कोणताही धोका नाही/ आगीचे कारण अस्पष्ट असून सध्या त्याबद्दल काही सांगू शकत नाही”.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!