Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : राज्यात ३ हजार १५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद , ५९ रुग्णांचा मृत्यू

Spread the love

राज्यात आज दिवसभरात ४ हजार ५८९ जणांनी कोरोनावर मात केली. तर, ३ हजार १५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून, ५९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १९ लाख ९७ हजार ९९२ वर पोहचली आहे. सध्या देशात ४६ हजार ७६९ अॅक्टिव्ह केसेस असून, आजपर्यंत १८ लाख ९९ हजार ४२८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, ५० हजार ५८२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

दरम्यान, राज्याती रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हीर रेट) ९५.७ टक्क्यांवर पोहचले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आजपर्यंत १,३९,५७,४६९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, यापैकी १९ लाख ९७ हजार ९९२ (१४.३१ टक्के) नमूने पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात २ लाख १८ हजार ३२५ जण गृहविलगीकरणात असून, २ हजार २३० जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

पुणे शहरात दिवसभरात ३१० करोनाबाधित रुग्ण आढळले असून, सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहारातील एकूण करोनाबाधितांची संख्या १ लाख ८३ हजार ७८७ वर पोहचली आहे. तर ४ हजार ७२० रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. दरम्यान ३५३ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर १ लाख ७६ हजार ८१२ जण करोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, स्तनदा माता, गर्भवती महिला व ताप असलेल्या व्यक्ती यांनी कोव्हॅक्सिन लस घेऊ नये, असा सल्लावजा इशारा भारत बायोटेक या कंपनीने दिला आहे. कोव्हॅक्सिन ही लस हैदराबादेतील या कंपनीने तयार केली असून तिला तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांआधीच मान्यता देण्यात आली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!