Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaNewsUpdate : इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांपैकी महाराष्ट्रातील एकूण ४३ जणांना संसर्ग

Spread the love

गेल्या २४ तासांत ६८ करोना बाधित रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. राज्यात आजतागायत करोनामुळं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या ४९ हजार ३७३ इतकी झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५६% एवढा आहे. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडाही झपाट्यानं खाली येताना दिसत आहे. सध्या राज्यात फक्त ५४ हजार ५३७ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर विविध रग्णालयांत उपचार सुरु आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,२६,००,७५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,२५,०६६ (१५.२८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,८९,५६० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,२०४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

दरम्यान, इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांपैकी महाराष्ट्रातील एकूण ४३ जणांना संसर्ग झाला असून त्यात पुण्यातील आणखी तिघांची भर पडली आहे. म्हणजेच पुण्यातील सहा जणांचा त्यात समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेला (एनआय़व्ही) आतापर्यंत ३२ पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने जनुकीय रचनेचा शोध घेण्यासाठी पाठविण्यात आले आहेत.

देशातील मृतांच्या संख्येत घट

दरम्यान देशात करोनाच्या संसर्गाची प्रकरणं आता कमी होताना दिसत आहेत. गेल्या सहा महिन्यांतील दिवसभरातील करोनाबाधितांची आकडेवारी आता १७ हजारांपर्यंत खाली आली आहे. त्याचबरोबर मृतांच्या रोजच्या संख्येतही घट झाली असून ती ३०० हून कमी झाली आहे, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

भूषण म्हणाले, “करोनाविरोधातील युद्धामध्ये आपण महत्वाचा टप्पा गाठला आहे. सहा महिन्यांनंतर करोनाची दैनिक प्रकरणं आता १७ हजारपेक्षा कमी झाली आहेत. रोजच्या मृतांचे प्रमाणही घटले असून ते ३०० पेक्षा कमी झाले आहे. ५५ टक्के प्रकरणांमध्ये मृतांचे वय हे सरासरी ६० वर्षे होते किंवा त्यापेक्षा अधिक होते. तर ७० टक्के पुरुष रुग्णांचे मृत्यू झाले आहेत.

लिंग आधारित करोनाच्या प्रकरणांचे विश्लेषण केल्यास ६३ टक्के पुरुष आणि २७ टक्के महिलांचे प्रमाण होते. वयाबाबत विचार केल्यास ८ टक्के प्रकरणं १७ वर्षांपेक्षा कमी, १३ टक्के प्रकरणं १८-२५ वर्षे, ३९ टक्के २६-४४, २६ टक्के ४५-६० आणि १४ टक्के प्रकरणं ६० वर्षांपेक्षा अधिक होते, अशी माहिती आरोग्य सचिवांनी दिली

देशात आता करोनाबाधित अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या केवळ २.७ लाख राहिली आहे. तसेच यामध्ये सातत्याने घट होत आहे. गेल्या आठवड्यात देशात करोना विषाणूच्या संक्रमणाचा पॉझिटिव्हिटीचा दर केवळ २.२५ टक्के होता, असेही भूषण यांनी यावेळी सांगितले

महाराष्ट्रात ५ हजार ५७२ रुग्णांना डिस्चार्ज

महाराष्ट्रात  मंगळवारी दिवसभरात करोनातून बरे झाल्याने एकूण ५ हजार ५७२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आत्तापर्यंत एकूण १८ लाख २० हजार २१ रुग्ण हे करोनामुक्त झाले आहेत. या आकडेवारीनुसार राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९४.५४ टक्के इतका झाला आहे. राज्यात आज ३,०१८ नवे करोना रुग्ण आढळले. तर राज्यात आज ६८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील मृत्यू दर हा २.५६ टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत यासंबंधीची माहिती दिली.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी २६ लाख ७५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९ लाख २५ हजार ६६ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या २ लाख ८९ हजार ५६० व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ३ हजार २०४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला ५४ हजार ५२७ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. आज राज्यात ३,०१८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १९ लाख २५ हजार ६६ झाली आहे

आपलं सरकार

Click to listen highlighted text!