Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimEUpdate : नोकरीचे आमिष दाखवून ३० लाख रूपयांची फसवणूक करणा-यास अटक

Spread the love

औरंंंगाबाद : पुणे जिल्हा परिषदेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एकाची ३० लाख रूपयांची फसवणूक करणा-यास जवाहरनगर पोलिसांनी गुरूवारी रात्री अटक केली. प्रशांत जयकुमार अचलारे उर्फ प्रवीण शिंदे (वय ४८, रा. सिध्दीविनायक अपार्टमेंन्ट, वृदांवन कॉलनी, आझादनगर, पुणे) असे फसवणूक करणा-या आरोपीचे नाव असल्याची माहिती जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या सुत्रांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश गजानन क-हाळे (वय ३५, रा.मनिषा बिल्डींग, शिवशंकर कॉलनी,गारखेडा परिसर) यांच्या पत्नीची २०१७ साली प्रशांत अचलारे उर्फ  प्रवीण शिंदे याच्यासोबत एका अध्यात्मीक व्हॉटसग्रुपवर ओळख झाली होती. क-हाळे यांच्या पत्नीस प्रशांत अचलारे हा बहिण म्हणत होता, तर योगेश क-हाळे यांना दाजी म्हणत होता.

दरम्यान, अचलारे याने माझी राजकीय नेत्यासोबत उठबैस असून तुम्हाला पुणे जिल्हा परिषदेत नोकरी लावून देतो असे क-हाळे यांना सांगितले. तसेच त्यासाठी ५० लाख रूपये द्यावे लागतील असे सांगितले. ५० लाख रूपयापैकी ३० लाख रूपये अगोदर द्यावे लागतील तर उर्वरीत २० लाख रूपये नोकरीची ऑर्डर मिळाल्यावर द्यावे लागतील असे सांगून योगेश क-हाळे यांच्याकडून ३० लाख रूपये २३ जुलै २०१९ ते २३ मार्च २०२० या काळात उकळले होते. पैसे दिल्यावरही नोकरी मिळत नसल्याने योगेश क-हाळे यांनी पैसे परत करण्यासाठी अचलारे याच्याकडे तकादा लावला होता. अचलारे हा तुमचे काम लवकरच करून देतो असे सांगून उडवा-उडवीची उत्तरे देत होता. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर क-हाळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून प्रशंत अचलारे याच्याविरूध्द जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता

आपलं सरकार

Click to listen highlighted text!