Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : जैसलमेरमध्ये जवानांनासोबत दिवाळी साजरी करताना मोदींचा चीन आणि पाकला इशारा

Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी या वर्षीची दिवाळी जैसलमेरमध्ये भारतीय जवानांसोबत दिवाळी साजरा करत आहे. यावेळी बोलताना त्यांनी ‘जगातील कोणतीच ताकद आमच्या सैनिकांना भारताच्या सीमेचं रक्षण करण्यापासून रोखू शकत नाही’, असे वक्तव्य करताना भारतीय सैन्यांचं कौतुक करत थेट पाकिस्तान आणि चीनला इशारा दिला आहे.

मोदी  म्हणाले कि , आज संपूर्ण जग विस्तारवादी ताकदींमुळे त्रस्त आहे. ही विस्तारवादी वृत्ती एक प्रकारे मानसिक विकृती असून ती १८व्या शतकातील विचार दर्शवते. भारत या विचारांच्याविरोधात प्रखर आवाज बनल आहे. जैसलमेर येथे सीमेवरील जवानांसोबत मोदी आज दिवाळी साजरी करीत आहेत. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्यांनी जवानांना आणि देशवासियांना संबोधित केले.

मोदी पुढे  म्हणाले, आज जगाला हे कळतंय की भारत आपल्या हितांविरोधात कोणत्याही किंमतीत थोडीही तडजोड करणार नाही. भारताची शान आणि उंची आपल्या शक्ती आणि पराक्रमामुळं टिकून आहे. आपण देशाला सुरक्षित ठेवलं आहे त्यामुळे आज भारत जागतीक व्यासपीठांवर प्रखरतेने आपली बाजू मांडत आहे.आंतरराष्ट्रीय सहकार्य कितीही पुढे आलेलं असलं आणि समीकरणं कितीही बदलली असली तरी आपल्याला हे विसरता येणार नाही की, सतर्कता हाच आपली सुरक्षेचा मार्ग आहे. सजगता हीच सुख-चैनीचा पाठिंबा आहे. सामर्थ्यचं विजयाचा विश्वास आहे. सक्षमताच शांतीचा पुरस्कार आहे, अशा शब्दांत मोदींनी देशाच्या सुरक्षेबाबत गांभीर्याने विचार करणं गरजेचं असल्याचं सांगितलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!