Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraCrimeUpdate : गुरे चारण्यासाठी शेतात गेलेल्या आदिवासी मुलीवर बलात्कार

Spread the love

पालघर जिल्ह्यात गुरे चारण्यासाठी गेलेल्या १६ वर्षांच्या आदिवासी मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मनोरमध्ये ही घटना घडली. या घटनेनंतर पीडित मुलीसह कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातील मनोरमध्ये २१ ऑक्टोबरला ही घटना घडली. पीडित मुलगी गुरे चारायला शेतावर गेली होती. त्याचवेळी एका व्यक्तीने तिला फरफटत नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. घटनेनंतर पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे अनोळखी व्यक्तीविरोधात कलम ३७६ आणि पॉक्सोंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहितीही पोलिसांनी दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!