Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काकासाहेब कणसे यांनी आत्महत्या का केली ?

Spread the love

औरंगाबादच्या  घाटी रूग्णालयातील सुपर स्पेशालिटी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन एका कोरोना रूग्णाने आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली. काकासाहेब श्रीधर कणसे (४२, रा. धनगाव, पैठण) असे आत्महत्या करणाऱ्या रुग्णाचे नाव आहे. कणसे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, तसेच पंचायत समिती सदस्यही होते. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय वाघचौरे आणि  कुटुंबीयांनी  केली आहे. त्यांच्या पत्नीही कोरोना पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर चितेगाव येथील कोविड सेंटरमध्ये उपचार चालू आहेत. त्या सकाळपासून गणेश कणसे यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा संपर्क झाला नाही आणि हि घटना घडली . मात्र त्यांच्या पत्नीला  सदर घटनेची  माहिती देण्यात आलेली नव्हती. दरम्यान बेगमपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी “महानायक” शी बोलताना सांगितले कि , घटनेचा सविस्तर तपशील घाटी प्रशासनाने पोलिसांना दिला असून या मृत्यू प्रकरणाची आम्ही चौकशी करीत आहोत.

या विषयीची अधिक माहिती अशी कि, काकासाहेब श्रीधर कणसे यांचा २१ सप्टेंबरला करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने २४ सप्टेंबरला दुपारी चार वाजेच्या दरम्यान अतिदक्षता विभागाच्या वॉर्ड क्रमांक ३४ मध्ये शिफ्ट करण्यात आले होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. रविवारी सकाळी त्यांनी शौचालयाला जायचे असल्याचे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना सांगितले होते. व्हेंटिलेटरवर असलेल्या रूग्णाला शौचालयात नेण्यात परवानगी नसल्याने, त्यांना पॉट देण्यात आले. त्यानंतर कर्मचारी बाहेर थांबले होते. काकासाहेब कणसे यांनी कोणालाही न सांगता, त्याच्या बेडजवळ असलेल्या खिडकीतून खाली उडी मारली, अशी माहिती सुपर स्पेशालिटी ब्लॉकचे विशेष कार्य अधिकारी डॉ. सुधीर जाधव यांनी दिली. या घटनेची नोंद बेगमपूरा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

संजय वाघचौरे यांची चौकशीची मागणी

दरम्यान ही घटना घडल्यानंतर पैठणचे माजी आमदार संजय वाघचौरे हे घाटीच्या सुपर स्पेशालिटी ब्लॉकमध्ये पोहोचले. त्यांनी घटनेबाबत डॉक्टरांशी चर्चा केली. २४ सप्टेंबरला काकासाहेब कणसे यांना व्हेंटिलेटर मिळावे, यासाठी प्रयत्न करण्यात आला होता. बेड उपलब्ध असूनही दोन तासांनी काकासाहेबांना बेड देण्यात आले. काकासाहेबांनी आत्महत्या का केली? याची चौकशी व्हायला पाहिजे, अशी मागणी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे करण्यात आली, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, आजच  पहाटे पाचच्या दरम्यान काकासाहेब कणसे यांनी त्यांचा भाऊ गणेश कणसे याला फोन करून धनगावहून औरंगाबादला यायला सांगितले. गणेश कणसे हा चित्तेगावपर्यंत आला असता, काकासाहेबने पुन्हा गणेश कणसे याला फोन केला. काकासाहेब यांनी आपल्याला खासगी रुग्णालयात दाखल करा असे सांगितले. दरम्यान सकाळी गणेश कणसे हे इमारतीच्या जवळ आले. पण त्यांना आतमध्ये जाऊ दिले नाही. शेवटी सकाळी ११ वाजता काकासाहेब कणसे यांनी इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले, असे गणेश कणसे याने सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!