MaharashtraNewsUpdate : शिवसैनिकांच्या मारहाणीत जखमी झालेले मदन शर्मा राज्यपालांच्या भेटीनंतर संघ आणि भाजपचे झाले…

Spread the love

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आक्षेपार्ह व्यंगचित्र सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे शिवसैनिकांच्या मारहाणीत जखमी झालेले  माजी  मर्चंट नेव्ही अधिकारी मदन शर्मा यांनी  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. आणि बाहेर आल्यानंतर आपण आत्तापासून भाजप-आरएसएससोबत असल्याची घोषणा केली आहे .  मदन शर्मा म्हणाले, “आत्तापासून मी भाजप आणि आरएसएससोबत आहे. जेव्हा मला मारहाण झाली तेव्हा त्यांनी माझ्यावर मी भाजप-आरएसएससोबत असल्याचा आरोप केला. त्यामुळे आता मी घोषणा करतो की आजपासून मी भाजप आणि आरएसएससोबत आहे.”

दरम्यान, मदन शर्मा यांना मारहाण प्रकरणी पोलिसांनी रात्री दोन वाजता शिवसेनेच्या ६कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा अटक केली आहे. या सर्वांना बोरिवली कोर्टात हजर करण्यात आलं. याआधीही या सर्वांना अटक करण्यात आली होती. मात्र, तेव्हा त्यांना जामीन मंजूर झाला होता. आता समता नगर पोलिसांनी शिवसेना कार्यकर्त्यांवर भारतीय दंड संहिता कलम ४५२ अंतर्गत देखील गुन्हा नोंद केला आहे. संबंधित आरोपींना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर आरोपींकडून जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला. यावर न्यायालयाने सर्व आरोपींना प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. त्यांना पोलीस तपासासाठी बोलावतील तेव्हा हजर राहण्याच्या अटीवर हा जामीन मंजूर करण्यात आला.

Leave a Reply

आपलं सरकार