CoronaMaharshtraUpdate : राज्यात गेल्या २४ तासांत  १७ हजार ६६ नवीन रुग्णांचे निदान , २५७ जणांचा मृत्यू

Spread the love

राज्यात गेल्या २४ तासांत  १७ हजार ६६ नवीन रुग्णांचे निदान झाले असून कोरोना संसर्गाने २५७ जणांचा मृत्यू झाला आहे . तर  दिवसभरात  १५ हजार ७८९ रुग्ण बरे होऊन घरी परतले  आहेत. राज्यातील एकूण रुग्णसंख्या १० लाख ७७ हजार ३७४ वर पोहचली आहे दरम्यान कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या महाराष्ट्रात आजचे आकडे काहीसे दिलासा देणारे आहेत. गेले काही दिवस राज्यात दररोज २० हजारापेक्षा अधिक नवीन रुग्णांची भर पडत होती. काल रविवारीच राज्यात २२ हजार ५४३ रुग्ण वाढले होते. आज मात्र या आकड्यात मोठी घट पाहायला मिळाली आहे. आतापर्यंत एकूण ७ लाख ५५ हजार ८५० रुग्णांनी करोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या ७०.१६ टक्के इतके असल्याची नोंद आजच्या आकडेवारीत करण्यात आली आहे.

कोरोना संसर्गामुळे आतापर्यंतचा एकूण आकडा २९ हजार ८९४ इतका झाला आहे. राज्यातील करोना मृत्यूदर सध्या २.७७ टक्के इतका आहे. तर  २ लाख ९१ हजार २५६ अॅक्टिव्ह रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. मुंबई शहर आणि उपनगरात करोना बाधित रुग्णांचा आकडा मात्र पुन्हा वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत ३१ जणांचा मृत्यू झाला असून २२५६ नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्याचवेळी १४३१ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरले आहेत. मुंबईत सध्या प्रत्यक्षात ३१ हजार ६३ रुग्णांवर उपचार सुरू असून १ लाख ३२ हजार ३४९ रुग्ण आतापर्यंत करोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील रुग्ण दुपटीचा वेग सध्या ५६ दिवसांवर आहे. राज्यात आजपर्यंत प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आलेल्या ५३ लाख २१ हजार ११६ नमून्यांपैकी आजपर्यंत १० लाख ७७ हजार ३७४ नमूने (२०.२ टक्के) पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे आजघडीला  राज्यात १७ लाख १२ हजार १६० जण होम क्वारंटाइन आहेत, तर ३७ हजार १९८ जण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइनमध्ये आहेत.

दरम्यान पुणे शहरात आज दिवसभरात ११०० नवे करोनाबाधित आढळले, तर ३९ रुग्णांचा मृत्यू झाला. याचबरोबर शहरातील करोनाबाधितांची एकूण संख्या १ लाख २० हजार ७५७ झाली आहे. तर आज अखेर २ हजार ८३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनावर उपचार घेणार्‍या १ हजार ४५६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आजपर्यंत करोनामुक्त झालेल्यांची संख्या १ लाख ५३२ झाली असल्याची माहिती, पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

Leave a Reply

आपलं सरकार