Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : सुशांतसिंग ड्रग्स कनेक्शन प्रकरणात रियाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Spread the love

देशभर गाजत असलेल्या सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्स कनेक्शन समोर आल्यानंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने सुशांतची मैत्रीण अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक करून, कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टाने रियाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. २२ सप्टेंबरपर्यंत हि  कोठडी राहील. दरम्यान रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी रियाच्या जामिनासाठी अर्ज केला होता मात्र  कोर्टाने हा अर्ज फेटाळून लावला. एनसीबीने कोर्टात रियाच्या जामिनाला विरोध केला. आता रियाला आज रात्री घरी जाता येणार नाही. तिला एनसीबीच्या कार्यालयातच रात्री मुक्काम करावा लागणार आहे. तिथून तिची उद्या सकाळी तुरूंगात रवानगी केली जाईल.

दरम्यान एनसीबीने न्यायालयात  रियाच्या जामिनाला विरोध करताना युक्तिवाद केला कि , रिया चक्रवर्ती या प्रकरणातील आरोपी आहे. तिला जामीन दिल्यास या प्रकरणावर परिणाम होऊ शकतो. रियाने या प्रकरणी अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. आणि त्यावर तपास करणं आवश्यक आहे. तर दुसरीकडे, रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी तिच्या जामिनासाठी बाजू मांडली. रियाने चौकशीत सहकार्य केले आहे. या प्रकरणी एनसीबीने रिमांड मागितलेली नाही. कारण एनसीबीने चौकशी पूर्ण केली आहे. रियाने स्वतःहून ड्रग्स घेतले नाही. कुणाच्या तरी सांगण्यावरून तिने ते पुरवले आहे. यामुळे तिला जामीन मिळाला पाहिजे. गरज पडेल तेव्हा ती पुन्हा चौकशीत सहकार्य करेल, अशी बाजू रियाचे वकील सतीश माने शिंदे यांनी मांडली. रियाही ड्रग्स सिंडिकेटची सक्रिय सदस्य आहे, असं एनसीबीने रिमांड कॉपीमध्ये म्हटलं आहे. यानुसार रियाने ड्रग्स घेतल्याची कबुली दिलेली नाही. ती सुशांतसिंह राजपूतला ड्रग्स पुरवत होती आणि ती ड्रग्स पुरवणाऱ्यांच्या संपर्कात होती. सुशांतच्या सांगण्यावरून रियाने ड्रग्स पुरवणाऱ्यांना पैसे दिले.

एनसीबीने आपल्या रिमांड अर्ज म्हटले आहे कि , शौविकच्या माध्यमातून ड्रग्स रियापर्यंत पोहोचत होते. ड्रग पुरवणारे सुशांतचे कर्मचारी सॅम्युअल मिरांडा आणि दीपेश सावंत यांच्याकडे ड्रग्स पाठवत होते. रियामार्फत ड्रग्स पुरवणाऱ्यांना पैसे दिले गेले. यासाठी सुशांतने पैसे दिले. रियाने तपासात सहकार्य केले. शौविक, सॅम्युअल, दीपेशकडून कोणतीही ड्रग्स सापडली नाहीत. अब्दुल बासित परिहार आणि जैद विलात्रा यांच्या मार्फत शौविक चक्रवर्तीने ते पुरवले होते. सॅम्युअल मिरांडा आणि दीपेश सावंत हे ड्रग्स पुरवणाऱ्यांकडून ते घ्यायचे. रिया आणि सुशांत त्यासाठी पैसे द्यायचे, असंही रिमांड अर्जात  नमूद करण्यात आले आहे. शौविक किंवा रियाने थेट ड्रग्स खरेदी केले नाही. दोघेही ड्रग्ज पुरवण्यात नक्कीच भागीदार होते. ड्रग्ससाठी रिया आणि सुशांत दोघेही सामील होते. रिया शौविक, सॅम्युअल आणि दीपेश यांना ड्रग्स घेण्यासाठी सांगत होती. पैशाचे व्यवहारही ती बघायची, असेही एनसीबीने म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!