Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : भारताच्या विरोधात चीन -पाकच्या संयुक्त कुरापती , युद्ध झाल्यास भारत चोख उत्तर देण्यास समर्थ , जनरल रावत यांनी ठणकावले

Spread the love

पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानला मिळत असलेल्या चीनच्या आर्थिक आणि लष्करी पाठबळाकडे आपण अधिक लक्ष देणं आवश्यक आहे. पश्चिमेवरील सीमेसह पूर्व सीमेवरही संघर्ष वाढत आहे. यासाठी आपण तयार असले पाहिजे. चिनी सैन्याने अलिकडेच सीमेवर केलेल्या काही आक्रमक कारवाया आमच्या लक्षात आल्या आहेत. त्यांना चोख उत्तर देण्याची क्षमता भारतात आहे, चीन आणि पाकिस्तान मिळून भारताविरोधात युद्ध करू शकतात, असा मोठा खुलासा सीडीएस जनरल बिपीन रावत यांनी दिली आहे.

याविषयी अधिक माहिती देताना रावत म्हणाले कि , पाकिस्तान भारताविरूद्ध छुपे युद्ध करत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या घुसखोरीशिवाय भारताच्या इतर भागातही दहशतवाद पसरवण्याचा पाकचा प्रयत्न आहे. उत्तर सीमेवर भारतासमोर समस्या निर्माण करण्याचा पाकचा डाव आहे. पण त्यात पाक अपयशी ठरेल आणि मोठं नुकसान सहन करावं लागेल. पश्चिम आणि पूर्वेकडील सीमेवर पाकिस्तान आणि चीनचा एकचवेळी हल्ला करण्याच्या धोक्याचा उल्लेख करताना दोन्ही सीमांवर उत्तर देण्यासाठीच्या तयारीवर आम्ही विचार केला आहे. भारतीय सैन्य दलांनी कुठल्याही संकटाला तोंड देण्यासाठी तयार असले पाहिजे आणि सोबतच भविष्यासाठीही तयारी ठेवली पाहिजे, असं रावत म्हणाले.

दरम्यान सीमेवर आम्हाला शांतता हवी आहे. पण अलीकडेच सीमेवर चीनच्या काही आक्रमक कारवाया आमच्या लक्षात आल्या आहेत. त्यांना चोख उत्तर देण्याची क्षमता आमच्यात आहे, असा इशारा देताना जनरल रावत यांनी स्पष्ट केले कि , भारत आणि अमेरिकेच्या संबंध उभय देशांमध्ये झालेल्या चर्चेने अधिक बळकट झाले आहेत. दोन्ही देश हिंद प्रशांत महासागराच्या सुरक्षेसाठी प्रयत्नशील आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या यावर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या भारत भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये ३ अब्ज डॉलर्सचा संरक्षण करार झाला होता. यानुसार भारत अपाचे हेलिकॉप्टर, चिनूक अशी अमेरिकन संरक्षण सामग्री घेईल. आता अमेरिकेने सतत संपर्कात राहून भारताला माहिती देत राहावे , अशी आमची अपेक्षा असल्याचेही रावत म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!