IndiaNewsUpdate : केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनाही कोरोनाची बाधा

Spread the love

गेल्या काही दिवसांमध्ये मोदी सरकारमधील आणखी एक  केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करून याबाबत माहिती दिली. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे कि , “मी करोनाची चाचणी केली आणि त्या चाचणीचे निकाल पॉझिटिव्ह आले आहेत. मी आता होम आयसोलेशनमध्ये आहे. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली करोना चाचणी करावी आणि आवश्यक ती काळजी घ्यावी,” असं श्रीपाद नाईक म्हणाले. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.

दरम्यान श्रीपाद नाईक यांच्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह,  अर्जुन राम मेघवाल, कैलास चौधरी यांनादेखील करोनाची लागण झाली होती.  देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग वाढत असून  आतापर्यंत देशात २३ लाखांपेक्षा अधिक लोकांना करोनाची लागण झाली आहे. तर दुसरीकडे करोनामुळे ४६ हजारांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १६ लाख रुग्णांनी करोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

आपलं सरकार