Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaUpdate : केंद्रीय गृहमंत्री यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह नाही , मनोज तिवारी यांना आपले ट्विट करावे लागले डिलीट….

Spread the love

देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यावर उपचार चालूच असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे . अद्याप त्यांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह अली नसल्याचे या वृत्तात म्हटले आहे.दिल्लीतील भाजपचे नेते आणि खासदार मनोज तिवारी यांनी  एक ट्विट करून त्यात त्यांनी गृहमंत्री अमित शहा करोना निगेटिव्ह आढळल्याचं सांगितलं होतं. परंतु, थोड्याच वेळात न्यूज एजन्सी एएनआयनं गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं अमित शहा यांची करोना चाचणी पुन्हा झालीच नसल्याचं स्पष्ट केले. त्यामुळे गृहमंत्री अमित शहा करोना निगेटिव्ह असल्याच्या वृत्ताला अधिकृतरित्या दुजोरा मिळालेला नाही. यामुळे मनोज तिवारी यांच्यावर आपले  ट्विट डिलीट करून  टाकण्याची नामुष्की ओढवली.

कोरोनाची काही लक्षणं आढळल्यानंतर अमित शहा यांची २ ऑगस्ट रोजी करोना टेस्ट करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर एम्सच्या डॉक्टरांची एक टीम उपचार करत होती. रुग्णालयात दाखल असतानाही गृह मंत्री सोशल मीडियावर अॅक्टिव्ह दिसत होते. आपली करोना टेस्ट पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती खुद्द गृह मंत्र्यांनी ट्विटद्वारे दिली होती. तसंच आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वत:ला क्वारंटीन करून करोना चाचणी करून घ्यावी, असं आवाहनही त्यांनी केलं होतं. त्यानंतर केंद्रीय मंत्री पियूष गोयल हेदेखील क्वारंटीन झाले होते. उल्लेखनीय म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या कॅबिनेट बैठकीतही अमित शहा सहभागी झाले होते. परंतु, या दरम्यान सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं.

दरम्यान गृह मंत्र्यांसोबतच केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल आणि कैलास चौधरी यांच्याही करोना टेस्ट पॉझिटिव्ह आढळल्या आहेत.  दोघांनीही स्वत: ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली होती. दोघांचीही तब्येत आता स्थिर आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!