Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaNewsUpdate : केरळ विमान अपघातातील मृतांमध्ये आढळले दोन कोरोनाबाधित !! मदत कार्य करणाऱ्या पथकाला केले क्वारंटाईन…!!

Spread the love

केरळमधील कोझिकोडच्या करीपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी रात्री  झालेल्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचा भीषण अपघातात मरण पावलेल्या १८ प्रवाशांपैकी दोन जण करोना पॉझिटिव्ह आढळून आल्याचे वृत्त असून यामुळे विमान अपघातानंतर मदत कार्यात असलेल्या सर्वांना क्वारंटाइन होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या विमान अपघाताच्या घटनेचा तपास एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्वेस्टिगेशन ब्यूरो (AAIB) करणार आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी तसे आदेश दिले आहेत. पुरी यांनी अपघातस्थळी जाऊन विमानाची पाहणी केली. त्याचबरोबर अपघाताबद्दल अधिकची माहिती घेतली.

केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी अपघातानंतर त्या ठिकाणचा दौरा केला. तसंच परिस्थितीची माहितीही घेतली. त्यानंतर त्यांनी अपघातग्रस्त प्रवाशांसाठी मदत जाहीर केली. दरम्यान, मृतांच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत करण्यात येणार आहे. तर गंभीररित्या जखमी झालेल्या प्रवाशांना २ लाख रूपयांची आणि किरकोळ जखमी झालेल्या प्रवशांना ५० हजार रूपयांची मदत करण्यात येणार असल्याची माहिती हरदीपसिंह पुरी यांनी दिली.

दरम्यान एअर इंडिया एक्स्प्रेस विमान अपघातात मृत्यू झालेल्यांपैकी दोघे करोना पॉझिटिव्ह निघाल्याचं वृत्त इंडिया टिव्ही या वृत्त वाहिनीने  दिले आहे. दुबईहून १९१ प्रवाशांना घेऊन आलेले एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान केरळमधील कोझिकोडच्या करीपूर विमानतळावर हे विमान रात्री ७.४१ वाजता उतरत असताना धावपट्टीवरून घसरले आणि खड्डय़ात कोसळले. हा अपघात एवढा भीषण होता की विमानाचे दोन तुकडे झाले. विमानाने उतरताना धावपट्टी सोडली आणि ते कुंपणाच्या भिंतीवर आदळून ३० फुटी खड्डय़ात कोसळले. त्यामुळे त्याचे दोन तुकडे झाले. यात भयंकर अपघातात १८ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर २२ जणांची प्रकृती गंभीर आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!