Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaAurangabadUpdate 13842 : जिल्ह्यात 9961 कोरोनामुक्त, 3412 रुग्णांवर उपचार सुरू, 469 जणांचा मृत्यू

Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यात आज 281 जणांना (मनपा 132, ग्रामीण 149) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 9961 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 276 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 13842 झाली आहे. आजपर्यंत एकूण 469 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3412 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दुपारनंतर 163 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 38, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 57 आणि ग्रामीण भागात 63 रूग्ण आढळलेले आहेत. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
ग्रामीण (65)
औरंगाबाद (4), फुलंब्री (2), गंगापूर (19), सिल्लोड (9), वैजापूर (12), पैठण (9), सोयगाव (8), टाकळी पांगरा,पैठण (1), वंजाळा, सिल्लोड (1)
सिटी एंट्री पॉइंट (38)
सिडको महानगर (3), भावसिंगपुरा (1), हर्सूल (1), शिवाजी नगर (1), शेंद्रा एमआयडीसी परिसर (1), बालाजी नगर (3), आडगाव खुर्द (1), राजीव गांधी नगर (1), संजय नगर (1), राम नगर (1), कुंभेफळ (1), आडगाव (1), हर्सूल (1), मयूर पार्क (3), म्हसोबा नगर (2) सातारा परिसर (1), पेठे नगर (1), गंगापूर, आंबेगाव (1), रांजणगाव (1), सावित्री नगर, चिकलठाणा (1), पडेगाव (2), नारेगाव (1), वेरूळ (1), वैजापूर (1) कन्नड (1), बजाज नगर (1), सिडको (1), लिंबे जळगाव (1), राहुल नगर, रेल्वे स्टेशन परिसर (1), चित्तेगाव (1)
मनपा (3)
पहाडसिंगपुरा (1), एनआरएच हॉस्टेल, घाटी परिसर (1), रोहिला गल्ली, सिटी चौक (1)

दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत रौफ कॉलनीतील 74 वर्षीय महिला आणि खासगी रुग्णालयात सिल्लोड तालुक्यातील 50 वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

UPDATE : 3:20 PM

जिल्ह्यात 3532 रुग्णांवर उपचार सुरू, 17 रुग्णांची वाढ

औरंगाबाद जिल्ह्यातील 17 रुग्णांचे अहवाल दुपारी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत 13679 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 9680 बरे झाले, 467 जणांचा मृत्यू झाला. तर 3532 जणांवर उपचार सुरु आहेत. रुग्णांचा जिल्ह्यातील भागाचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :
मनपा (17)
बन्सीलाल नगर (2), बाजीप्रभू चौक, गजानन नगर (1), सुराणा नगर (1), जवाहर कॉलनी (2), वेदांत नगर (4), एन दोन सिडको (1), मयूर नगर, हडको (1), अन्य (1), एन नऊ हडको (1), आंबेडकर नगर (1), झांबड इस्टेट परिसर (1), सुराणा नगर (1)

तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत विश्रांती नगरातील 46 वर्षीय पुरूष, अविष्कार कॉलनी, एन सहा, सिडकोतील 79 वर्षीय पुरूष आणि खोकडपुऱ्यातील 76 वर्षीया महिला रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

MORNING UPDATE

जिल्ह्यात 3518 रुग्णांवर उपचार सुरू, 96 रुग्णांची वाढ

औरंगाबाद जिल्ह्यातील 96 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत 13662 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 9680 बरे झाले, 464 जणांचा मृत्यू झाला. तर 3518 जणांवर उपचार सुरु आहेत.
ग्रामीण भागातील अँटीजनचाचणीद्वारे आढळलेल्या 65 रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. रुग्णांचा जिल्ह्यातील भागांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :
ग्रामीण (73)
औरंगाबाद (6), फुलंब्री (3), गंगापूर (22), खुलताबाद (8), सिल्लोड (3), वैजापूर (7), पैठण (4), सोयगाव (12), अंभई सिल्लोड (1), स्नेहवाटिका, सिडको महानगर (1), वाळूज (1), बजाज नगर, वाळूज (1), फुले नगर, वडगाव (1), आडगाव माडरवाडी, कन्नड (2), टाकळी, खुलताबाद (1)
मनपा (23)
नागेश्वरवाडी (1), एमजीएम मेडिकल कॉलेज परिसर (3), एन दोन सिडको (2), मराठवाडा केमिकल इंडस्ट्री परिसर (1), मार्ड हॉस्टेल (1), खोकडपुरा (1), मिटमिटा (1), प्रबुद्ध नगर, पानचक्की परिसर (3), एन सात सिडको (5), शांतीनाथ सो., गादिया विहार (1), साजापूर (1), रोजा बाग (1), आनंद नगर, कोटला कॉलनी (1), फरहाद नगर, जटवाडा रोड (1)

आपलं सरकार

Click to listen highlighted text!