धक्कादायक : मारहाण केल्याच्या रागातून मुलानेच केली वडील आणि भावाची हत्त्या

Advertisements
Advertisements
Spread the love

जळगाव, जामनेर येथील नांद्रा भागात वडील आणि भावाने मारहाण केल्याच्या रागातून मुलाने त्यांची धारदार शस्राने हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. निलेश पाटील हा पुण्यात रोजंदारीवर कामाल होता. लॉकडाऊनमुळे काम बंद झाल्याने तो आपल्या गावी गेला होता. दरम्यान त्याच्या भाऊ देखील काम बंद झाल्याने आपल्या गावी परतला होता.

Advertisements

गावी आल्यानंतर निलेशचे शेजाऱ्यांसोबत सतत वाद सुरु होते. निलेशला वारंवार समजवून देखील तो ऐकत नसल्याने, शेजाऱ्यांसोबत का भांडतोस असा जाब वडील आणि भावाने विचारला आणि निलेशला मारहाण केली. याचा राग त्याने मनात ठेवला. निलेश या मारहाणीमुळे दुखावला गेला होता. याचा बदला घेण्यासाठी त्याने रात्री वडील झोपेत असताना त्यांच्यावर चाकूने वार केले. त्याला आवरण्यासाठी भाऊ आणि आई धावली. मात्र संतापाच्या भरात त्याने आपल्या भावालाही जागीच ठार केले.

Advertisements
Advertisements

या प्रकरणी निलेशविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर निलेशच्या छोट्या भावाची पत्नी या घटनेदरम्यान बाहेर पळून गेल्याने तिचा जीव वाचला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहाणी केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. तर निलेशला चौकशीसाठी ताब्यत घेतल्याचे वृत्त आहे.

आपलं सरकार