AmitabhCoronaNewsUpdate : मोठी बातमी : आराध्या आणि ऐश्वर्यालाही कोरोनाने गाठले, जाणून घ्या अमिताभ १० दिवसांपूर्वी कुठे गेले होते ?

Advertisements
Advertisements
Spread the love

बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता ऐश्वर्या रॉय बच्चन आणि आराध्या बच्चन यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. जया बच्चन यांची कोरोना टेस्ट मात्र निगेटिव्ह आली आहे. अमिताभ बच्चन यांची प्रकृती स्थिर आहे. काल रात्री बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आलं आहे. दरम्यान आता बिग बी अमिताभ यांची प्रकृती स्थिर आहे. नानावटी हॉस्पिटलकडून अधिकृत माहिती देण्यात आली असून त्यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलं की, अमिताभ बच्चन यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना कोविड 19 ची काहीशी लक्षणं आहेत. ते सध्या नानावटी सुपर स्पेशिलिटी हॉस्पीटलमध्ये आयसोलेशन यूनिटमध्ये भरती आहेत. दरम्यान सकाळी उठून त्यांनी नाश्ता केला असल्याचं देखील डॉक्टरांनी सांगितलं आहे.

Advertisements

काल रात्री जया बच्चन , ऐश्वर्या आणि आराध्या यांची टेस्ट निगेटिव्ह आल्याचे सांगण्यात आले होते मात्र आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार ऐश्वर्या आणि आराध्या यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्याचे वृत्त आहे.  अमिताभ बच्चन यांच्यासह बच्चन कुटुंबातील चौघांना करोनाची लागण झाल्याने अमिताभ यांच्या चारही बंगल्यांना आज तडकाफडकी सील करण्यात आले. मुंबई महापालिकेने ही कारवाई केली आहे. दरम्यान आज सकाळी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी जुहू येथे जाऊन अमिताभ यांच्या जनक, प्रतिक्षा, वत्सा आणि जलसा या चारही बंगल्यांचं सॅनिटायझेशन केलं. सुमारे तीन तास हे काम चाललं. त्यानंतर आज दुपारी बच्चन कुटुंबातील आणखी काही जणांच्या करोनाचे रिपोर्ट आले. त्यात ऐश्वर्या राय-बच्चन आणि त्यांनी मुलगी आराध्या बच्चन यांनाही करोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. तर श्वेता नंदा, अगस्त्या नंदा, नव्या नवेली आणि जया बच्चन यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. मात्र ऐश्वर्या आणि आराध्या यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने अमिताभ यांचे हे चारही बंगले सील करण्यात आले आहेत. महापालिकेने सकाळीच हे चारही बंगले प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले होते. त्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

Advertisements
Advertisements

दरम्यान लॉकडाऊन काळात मे महिन्यात अमिताभ बच्चन यांनी ‘कौन बनेगा करोडपती 12’ साठी काही प्रोमोज आपल्या घरीच शूट केले. या शूटसाठी ‘दंगल’ आणि ‘छिछोरे’ चे दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी रिमोटच्या साहाय्याने दिग्दर्शन केलं होते. फिल्म इंडस्ट्रीतील सूत्रांच्या माहितीनुसार दहा दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन एका प्रोमोशनल/अॅड फिल्मच्या डबिंगसाठी आपल्या ऑफिसच्या स्टुडिओत गेले होते. काल रात्री बच्चन यांनी स्वत: ट्वीट करत, कोरोना झाल्याचं सांगितलं होतं. ‘माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे मला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. घरातील सदस्यांच्याही कोरोना चाचणी करण्यात आल्या असून त्यांचा अहवाल येणे बाकी आहे. मागील 10 दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करावी’, अशी विनंतीही बच्चन यांनी केली होती. त्यांच्या पाठोपाठ अभिषेक बच्चन यांचीही टेस्ट पॉझिटिव्ह आली असून त्यांच्यावर उपचार चालू असतानाच हे वृत्त आल्याने खळबळ उडाली आहे .

अमिताभ बच्चन यांना कोरोना झाल्याचं समोर आल्यानंतर आता अभिनेते अनुपम खेर यांच्या आईला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. अनुपम खेर यांच्या आई दुलारी यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. अनुपम खेर यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन एक व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, त्यांच्या आईला मुंबईच्या कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखलं केलं आहे. भाऊ, वहिनींनी काळजी घेऊन देखील त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मी माझी टेस्ट केली आहे, ती निगेटिव्ह आली आहे, असं अनुपम खेर यांनी सांगितलं.

आपलं सरकार