Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

BreakingNews : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड ! आंबेडकर कुटुंबियांचे आवाहन

Spread the love

मुंबई – भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  मुंबईतील “राजगृह ” या निवासस्थानी आज संध्याकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान अज्ञात व्यक्तींकडून कंपाऊंड मधील कुंड्या आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड करण्यात आली असल्याचे वृत्त आहे. या माथेफिरूने  राजगृहाच्या काचांवरही दगडफेक केली. याबाबत माटुंगा पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिल्याची माहिती भीमराव आंबेडकर यांनी दिली असून पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.

दरम्यान आंबेडकरप्रेमी जनतेने या घटनेबाबत संयम ठेवून कोणीही राजगृहाकडे येऊ नये तसेच शांतता ठेवावी असे आवाहनही भीमराव आंबेडकर, आनंदराज आंबेडकर आणि  वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर  यांनी केले आहे . सोशल मीडियावर या घटनेची माहिती मिळताच राज्यात सर्वत्र खळबळ उडाली असून रात्री उशिरा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी चौकशीचे आणि आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान  वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांना या हल्ल्याबाबत विचारले असता प्रारंभी त्यांनी आपण दौऱ्यावर असून याबाबत आपणास सध्या काहीही माहिती नाही , अधिकृत माहिती घेऊन सांगतो अशी प्रतिक्रिया दिली. याच वेळी महानायक ऑनलाईनने भीमराव आंबेडकर , आनंदराज आंबेडकर, शिवाजी पार्क पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. शेवटी आमच्या  प्रतिनिधीने याबाबत अधिक माहिती घेऊन  माटुंगा पोलीस अधिक तपास करीत असल्याचे सांगितले.

दरम्यान रात्री साडेअकराच्या सुमारास बाळासाहेब आंबेडकर यांनी प्रबुद्ध भारताच्या अधिकृत पेजवर लाईव्ह येत सांगितले कि , “हल्ल्याची बातमी खरी असून सर्व जनतेस आवाहन करतो कि , आपण शांतता ठेवली पाहिजे.  राजगृहावर दोघांनी येऊन सीसीटीव्ही फोडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी याची ताबडतोब दखल घेतली असून सर्व अधिकारी घटनास्थळी येऊन चौकशी करीत आहेत . अत्यंत चोख काम पोलिसांनी केलेले आहे . राजगृहाच्या आजूबाजूला कोणीही जमू नये अशी विनंती मी आपण सर्वांना करीत आहे.”

मुंबई स्थित शिवाजी पार्क दादर येथील राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असून  जगभरातील आंबेडकरी  अनुयायी राजगृहाला भेट देण्यासाठी अत्यंत श्रद्धेने येत असतात . त्यामुळे आंबेडकरी  अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे.

प्रबुद्ध भारताच्या पेजवर याबाबत माहिती देताना म्हटले आहे कि ,  आज संध्याकाळच्या सुमारास दोन माथेफिरुंनी हा प्रकार केला. यात त्यांनी घराबाहेरील CCTV चेही मोठे नुकसान केले आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस घटनास्थळी हजर असून हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे दरम्यान  आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे CCTV फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे. आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!