Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : रविवारपासून सुरु होताहेत कटिंग सलून ….

Spread the love

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात येत्या रविवारपासून म्हणजेच 28 जूनपासून सलून सुरु करण्यास राज्य सरकारनं सशर्त परवानगी दिली आहे. राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनदरम्यान सर्व व्यवहार ठप्प होते. मात्र अनलॉकिंगनंतर हळूहळू सर्व व्यवहार सुरळीत करण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरु केले आहे.सलून या आठवड्यात सुरु होईल, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे. त्याच बरोबर ब्युटी पार्लर आणि जिम सुरू करण्याबाबतही लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.

दरम्यान सरकारकडून सलून व्यवसाय सुरू करण्याबाबत काही नियम व अटी ठेवल्या आहेत. त्या म्हणजे, सलूनमध्ये केवळ केस कापण्यास परवानगी देण्यात आली आहे. दाढी करण्यास परवानगी नाही. तसेच सलून चालक आणि ग्राहक या दोघांना मास्क अनिवार्य आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही, याबाबत खबरदारी घेण्याच्याही सुचना देण्यात आल्या आहेत.

राज्यात लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात सरकारनं काही नियम शिथिल केले होते. नियम व अटींवर काही व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढेल या पार्श्वभूमीवर सलून व्यवसायाला सरकारने परवानगी नाकारली होती. त्यामुळे सलून व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती.  लॉकडाऊनमुळे आलेल्या अर्थिक संकटामुळे राज्यात आतापर्यंत 5 सलून व्यावसायिकांनी आत्महत्या केल्या आहेत. याला राज्य सरकार जबाबदार आहे, असा आरोप नाभिक समाजाचे  सोमनाथ काशिद यांनी केला होता.

एकीकडे अन्य व्यवसायांना परवानगी दिली असताना, सलून व्यवसायाला परवानगी का नाही, असा सवाल नाभिक समाज आणि सलून व्यावसायिकांनी सरकारला केला होता. मात्र, सरकार सकारात्मक भूमिका घेत नसल्याचं दिसताना नाभिक समाज आणि सलून व्यावसायिकांनी हायकोर्टात याचिका दाखल करण्याची तयारी केली होती. दरम्यान, राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत आधीच संकेत दिले होते. येत्या चार-पाच दिवसांत राज्यात  सलून व्यवसाय सुरु करण्याबाबत निर्णय होईल, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं होतं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!