Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaVirusEffect : पुरुषांपेक्षा महिलांना कोरोना संसर्गाचा धोका अधिक, जाणून घ्या नवीन संशोधन

Spread the love

कोरोना व्हायरसच्या संदर्भात रोज नवं नवीन संशोधन येत असून आता कोरोना बाधित पुरुष रुग्णांमध्ये महिलांपेक्षा अधिक रोग प्रतिकार क्षमता असल्याचे समोर आले आहे. तर महिलांमध्ये कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोका असल्याचे  पुरावे संशोधकांच्या हाती लागले असल्याचे वृत्त आहे. भारतातील २० मे पर्यंतच्या आकडेवारीनुसार, एकूण करोनाबाधितांमध्ये पुरुषांचा मृत्यू दर २.३ टक्के आहे, तर महिलांमध्ये हा दर ३.३ टक्के आहे. ग्लोबल हेल्थ सायन्स या जर्नलमध्ये ‘समान धोका, असमान भार?’ हे नवीन संशोधन प्रकाशित करण्यात आले  आहे.

दरम्यान संशोधकांच्या विश्लेषणानुसार, २० मे पर्यंत एकूण करोनाबाधितांपैकी ६६ टक्के पुरुष आहेत, तर ३४ टक्के महिला आहेत. पण या संसर्गामध्ये ५ वर्षांखालील मुले आणि वृध्दांचाही समावेश आहे. यात पुरुषांचा मृत्यू दर २.३ टक्के आणि महिलांचा ३.३ टक्के एवढा आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुरुवातीला दिलेल्या आकडेवारीनुसार, एकूण कोरोनाबाधितांपैकी तीन चतुर्थांश हे पुरुष होते. पण कोरोनाचं वयोगटात, लिंगनिहाय वर्गीकरण करणं आवश्यक असल्याचे संशोधकांचे  म्हणणे  आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार भारताचा मृत्यू दर ३.३४ टक्के आहे. तर संशोधकांनी मृत्यू दराचा अंदाज हा ४.८ टक्के असा लावला आहे. वयोगटात आणि लिंगनिहाय करोना संसर्गाचं वर्गीकरण आवश्यक आहे.

विविध देशांच्या आकडेवारीनुसार पुरुषांना संसर्गाचा धोका अधिक होता आणि मृत्यूचंही प्रमाण पुरुषांमध्येच जास्त होतं, असे  संशोधक एसव्ही सुब्रमण्यम यांनी आपल्या अभ्यासात म्हटले आहे. राष्ट्रीय लोकसंख्या संशोधन केंद्र, आर्थिक वाढ संस्था दिल्ली, आरोग्य व्यवस्थापन संशोधन संस्था दिल्ली, आयआयएचएमआर विद्यापीठ जयपूर, विकास अभ्यास केंद्र तिरुवअनंतपुरम, लोकसंख्या आणि विकास अभ्यास हार्वर्ड केंद्र कॅम्ब्रिज, समाज आणि वर्तणूक विज्ञान अमेरिका विभाग, हार्वर्ड सार्वजनिक आरोग्य शाळा बोस्टन अशा संस्थांमधील शास्त्रज्ञांनी आकडेवारीच्या (https://www.covid19india.org) आधारावर वयोगट, लिंग यानुसार मृत्यू दराचा प्राथमिक अंदाज सांगितला आहे.

भारतात २९ मार्च ते १ एप्रिल या चार दिवसात करोनाबाधितांचा आकडा १०१९ वरुन २०५९ म्हणजे दुप्पट झाला. तर २३ एप्रिल ते ३ मे या काळात दुप्पट होण्यासाठी ११ दिवस लागले. ५ मे ते १८ मे या काळात करोनाबाधितांचा आकडा ४९ हजार ४०५ वरुन १ लाख ३२७ वर गेला. २० मेपर्यंत या सर्व आकडेवारीच्या आधारावर एकूण ३४.३ टक्के महिलांना करोनाची लागण झाली असल्याचं या अभ्यासात म्हटलं आहे. संसर्गाचा भार पाच वर्षांखालील मुलांमध्ये कमी-अधिक प्रमाणात सारखाच आहे. पाच वर्षांखालील वयोगटातील संसर्गात मुलांचं प्रमाण ५१.५ टक्के आणि मुलींचं प्रमाण ४८.५ टक्के आहे. मध्य वयोगटात संसर्गाचा भार जास्त आहे. ३० ते ३९ या वयोगटात संसर्ग झालेल्यांचं प्रमाण ७०.४ टक्के एवढं आहे. वयोमानानुसार महिलांमधील संसर्गाचं प्रमाणही जास्त आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!