Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ताजी बातमी : औरंगाबाद जिल्ह्यात 47 रुग्णांची वाढ, 526 रुग्णांवर उपचार सुरू, एकूण मृत्यू संख्या 85

Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 47 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1696 झाली आहे. यापैकी 1085 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 85 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 526 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. जसवंतपुरा (1), संजय नगर, मुकुंदवाडी (1), खोकडपुरा (2), अजिंक्य नगर (1), समता नगर (2), समृद्धी नगर, एन-4 सिडको (1), जय भवानी नगर (1), लेबर कॉलनी (2), मिल कॉर्नर (4), हमालवाडी, रेल्वे स्टेशन (1), भावसिंपुरा (2), शिवशंकर कॉलनी (5), पिसादेवी रोड (1), कटकट गेट (1), सिल्लेखाना नूतन कॉलनी (1), बारी कॉलनी (1),उल्का नगरी (1),एन-सहा, संभाजी कॉलनी, सिडको (1),शरीफ कॉलनी (1),कैलास नगर (4), स्वप्न नगरी, गारखेडा परिसर (1), भवानी नगर, जुना मोंढा (1), पुंडलिक नगर रोड, गारखेडा (1), विद्यानिकेतन कॉलनी (1), सुराणा नगर (2), अन्य (3) आणि यशवंत नगर, पैठण (3), अब्दुलशहा नगर, सिल्लोड (1) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये 21 महिला आणि 26 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

खासगी रुग्णालयात एका कोरोनाबाधिताचा मृत्यू

औरंगाबाद शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये एन-चार ‍सिडको परिसरातील कोरोनाबाधित असलेल्या 74 वर्षीय पुरूष रुग्णाचा आज सकाळी 6.30 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला.
त्यामुळे आतापर्यंत घाटीत 68, तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 16, मिनी घाटीमध्ये 01 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण 85 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!