Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusEffect : मुंबईत आणखी एका पोलिसांचे निधन , राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या १९६४

Spread the love

मुंबईतील कोरोनाची स्थिती अधिकच बिकट होत असून मुंबई पोलीस दलातील आणखी एका पोलिसाचा बुधवारी करोनाने मृत्यू झाला आहे. दादर पोलिस ठाण्यात नेमणुकीला असलेले हेड कॉन्स्टेबल शरद मोहिते (५५) यांचे उपचारादरम्यान निधन झाले. दरम्यान, राज्यात करोनाने मृत पावलेल्या पोलिसांची संख्या आता २१ वर पोहोचली असून आतापर्यंत १९६४ पोलिसांना करोनाची लागण झाली आहे.

उपल्बध आकडेवारीनुसार  मुंबईमध्ये करोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना पोलीसही करोनाच्या विळख्यात सापडले आहेत. मुंबईत शरद मोहिते यांच्या रूपाने आणखी एका पोलिसाला करोनामुळे प्राणास मुकावे लागले असून आतापर्यंत मुंबईत करोनाने १३ पोलिसांचा मृत्यू झाला आहे तर राज्यात हाच आकडा २१ वर पोहचला आहे. चिंतेची बाब म्हणजे राज्यातील तब्बल १९६४ पोलीस आतापर्यंत करोनाच्या विळख्यात सापडले असून सततच्या ड्युटीमुळे पोलिसांवरील ताण वाढत चालला आहे.

गेल्या २४ तासांत राज्यात ७५ पोलीस कर्मचाऱ्यांना करोना विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे चिंता वाढली आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील करोना बाधित कर्मचारी-अधिकाऱ्यांची संख्या आता १९६४ झाली आहे. तर पोलीस दलातील मृत्यूंची संख्या २१ वर पोहोचली आहे. करोना बाधित पोलीस कर्मचाऱ्यांपैकी ८४९ जणांनी करोनावर मात केली आहे तर १०९५ पोलिसांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत, अशी माहिती राज्य पोलीस दलाकडून देण्यात आली. करोना बाधितांमध्ये राज्यातील २२३ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे तर १७४१ कर्मचारी आहेत. अद्याप १५५ अधिकारी आणि ९४० पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. ६७ पोलीस अधिकारी हे या आजारातून बरे झाले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!