Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad News Update : रुग्णाला कोविड 19 ची लक्षणे असो अथवा नसो त्या रुग्णाला सेवा नाकारता येणार नाही : जिल्हाधिकारी

Spread the love

आरोग्य सेवा पुरविणाऱ्या रुग्णालयांना जिल्हाधिकाऱ्यांचे सक्त आदेश

औरंगाबाद  जिल्ह्यात साथीच्या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक ती सर्व पाऊले उचलण्याचे अधिकार महामारी रोग अधिनियम 1897 नुसार  जिल्हाधिकारी यांना सोपविण्यात आले आहे. त्या अंतर्गत प्रभावी व्यवस्थापन व कोविड 19 चा प्रसार रोखण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात  जिल्हाधिकारी  उदय चौधरी , यांनी खालील आदेश जारी केले आहेत. या आदेशान्वये  जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा प्रदात्यांनी (रुग्णालये) कोविड विषाणूच्या प्रादुर्भावाला अटकाव करण्याच्या दृष्टीने निर्देशित मार्गदर्शक सूचना  पाळणे आवश्यक आहे. आरोग्य सेवा पुरविणाऱ्या कोणत्याही संस्थेत येणाऱ्या रुग्णाला कोविड 19 ची लक्षणे असो अथवा नसो त्या रुग्णाला संस्थेमध्ये सामान्यत: पुरविण्यात येणाऱ्या सेवा देण्याचे नाकारता येणार नाही.

प्रत्येक आरेाग्य सेवा संस्थेमध्ये कोविड-19 बाधित रुग्णाच्या उपचारासाठी आवश्यक असणारी पुर्ण तयारी असली पाहिजे.  या संस्थेने ICMR आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे अनुपालन करावे. ज्या रुग्णालयामध्ये 100 पेक्षा जास्त खाटा आहेत त्यांनी 50 टक्के खाटा कोविड-19 बाधित रुग्णासांठी राखुन ठेवाव्यात. संशयित किंवा बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली तर 10 खाटा असणारा एक स्वतंत्र कक्ष या रुग्णासाठी राखुन ठेवण्यात यावा.
कोणत्याही रुग्णालयाने वरील मार्गदर्शक सुचनांचे पालन केल्याशिवाय कोविड 19 च्या तपासणीसाठी नमुने संकलित करुन पाठवू नयेत. ICMR दिलेल्या मार्ग्दर्शक सुचनेनुसार कोविड-19 आणि RT-PCR  चाचणी करण्यात यावी. आणि इतर रुग्णालयाने मात्र रुग्णाच्या प्राथमिक चाचणी नंतर आवश्यकतेनुसार त्या रुग्णाला महापालिकेच्या ताप नियंत्रण कक्षात अथवा जिल्हा ग्रामीण रुग्णालयात पाठवावे.

औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागात कोविड-19 चा व्यापक प्रसार लक्षात घेता सर्व रुगणालयाने साथीच्या कालावधीत संरक्षण विषयक काळजी घ्यावी. कोणतेही संभाव्य अज्ञात वाहक (कॅरीयर) आरोग्य कर्मचारी आणि इतर रुगणाच्या संपर्कात येणार नाही, याची दक्षता घेण्यात घ्यावी. रुग्णालयाच्या परिसरात चेहऱ्यावर मास्क लावणे आणि शारिरिीक अंतर ठेवणे अनिवार्य असेल. सर्व अभ्यागतांना रुग्णालयाच्या इमारतीत व परिसरातील प्रमुख ठिकाणी सॅनिटायझर उपलबध करुन द्यावे.
जिल्ह्यातील आरोग्य सुवा पुरविणाऱ्या नर्सिग व इतर सहायक कर्मचारी वर्ग महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा देखभाल अधिनियम (मेस्मा)2005 अन्वये ज्या आरोग्य सेवा पुरविणाऱ्या संस्थांत आहेत त्यांना औरंगाबाद जिल्ह्यातील इतर सहायक कर्मचारी वर्ग पूर्ण पाठींबा देतील आणि मनापासून सहकार्य करतील.
या मार्गदर्शक सुचनांच्या अंमलबजावणीमध्ये अडथळा आणणाऱ्यांच्या विरुध या अधिनियमान्वये दंडात्मक कारवाई करण्यात येईल.  सेवा प्रदात्यांनी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 21 मे 2020 च्या अधिसुचनेचे काटेकोर पालन केले पाहिजे.

औरंगाबाद जिल्हा स्तरावरील  प्रत्येक आरोग्य प्रदात्याने साथीच्या काळात ICMR ने जारी केलेल्या मृतदेहाची विल्हेवाट लावणसाठी असलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे , असे जिल्हाधिकारी यांच्या द्वारा जारी करण्यात आलेल्या आदेशात नमूद आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!