Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने मुख्यमंत्री निधीसाठी साडे सतरा लाखांची रक्कम

Spread the love

 शिक्षक व कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन जमा

डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १७ लाख ५५ हजार रुपयांची रक्कम देण्यात आली आहे . मा कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांनी केलेल्या आवाहनाला सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी एक दिवसाचे वेतन देऊन प्रतिसाद दिला आहे . .

‘कोरोना’ (कोव्हीड-१९) नंतरच्या उपाय योजनेसाठी एक दिवसाचे वेतन मदतीच्या स्वरुपात मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात आले. मा कुलगुरू डॉ प्रमोद येवले व कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे शुक्रवारी  (दि. १७) धनादेश सुपूर्द केले .

यामध्ये  कुलगुरू, प्रकुलगुरू, कुलसचिव यांच्यासह सर्व संवैधानिक अधिकारी तसेच ५७० शिक्षक , अधिकारी व कर्मचारी यांचे एक दिवसाचे वेतन मिळून १६ लाख ८० हजारांचा धनादेश देण्यात आला. तसेच राजर्षी शाहू महाराज रोजदांरी कर्मचारी संघटना व आयएसएफ सर्विसेस यांच्याकडून विद्यापीठामार्फत ७५ हजारांची रक्कम जमा करण्यात आली .
दरम्यान, आपला देश आणि राज्य सध्या कोव्हीड-१९ कोरोना व्हायरसच्या अत्यंत गंभीर अशा संकटातून जात आहे. भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन कोरोना व्हायरसचा (कोव्हीड-१९) प्रकोप रोखण्याकरिता प्रयत्नशील आहेत. राज्यातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांनी मुख्यमंत्री निधीसाठी निधी द्यावा, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री   उदय सामंत यांनीही केलेले आहे . प्रत्येक नागरिकाने आपल्या देशासाठी काहीतरी केले पाहिजे. या भावनेतून संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक व कर्मचारी यांनी आपले एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता द्यावे, असे आवाहन कुलगुरू डॉ . प्रमोद येवले यांनी केले आहे .

आपलं सरकार

Click to listen highlighted text!