Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : देशभरात २४ तासात वाढले ४७२ रुग्ण आणि झाले ११ मृत्यू , देशातील रुग्णांची संख्या ३३७४ , सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन…

Spread the love

लोकडाऊनच्या काळातही देशातले कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. गेल्या २४ तासात ४७२ नवीन रूग्ण आढळून आलेत अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने घेतलेल्या पत्रकार परिषद देण्यात आलीय. मंत्रालयातले सचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली. त्यामुळे रूग्णांची एकूण संख्या ३३७४ झाली आहे. आत्तापर्यंत ७९ मृत्यू झाले असून गेल्या २४ तासांमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला. तर २६७ जण आजारातून बरे झालेत. तर देशातल्या २७४ जिल्ह्यांमध्ये कोरोना पसल्याची माहितीही त्यांनी दिली. लॉकडाउन आणि सोशल डिस्टन्सिंग हे सर्वात मोठं सामाजिक औषध आहे. सरकार आणि तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनांचं पालन जेव्हढ्या काटेकोरपणे केलं जाईल तेवढ्या प्रमाणात कोरोनाला रोखण्यात यश मिळेलं असंही अग्रवाल यांनी म्हटलं आहे.

भारतात ३० जानेवारी रोजी पहिला कोरोना रुग्ण केरळमध्ये आढळून आला. त्यानंतर आता तब्बल कोरोनाची संख्या तिपटीने वाढली आहे. सुरुवातीला केवळ विदेशातून परतलेल्या लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. मात्र आता हळुहळु क्लस्टर आउटब्रेक आणि संपर्कातून संक्रमण होण्यास सुरुवात झाली आहे. भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेने रुग्णांचा आकडा कमी दिसत असला तरी, त्यात होणारी वाढ ही भारतासाठी धोक्याची आहे. भारत अजूनही दुसऱ्या टप्प्यात आहे.

भारतात कोरोनाच्या रुग्णांची वाढ ही गेल्या महिन्याभरात सर्वात जास्त झाली. ३० जानेवारी ते २ मार्च या कालावधीत भारतात केवळ ५ कोरोनाचे रुग्ण होते. मात्र पुढच्या ८ दिवसात ही संख्या ५० झाली. तर, एका महिन्यात ही संख्या २५००पर्यंत पोहचली. त्यामुळं २ मार्च ते २ एप्रिल या ३० दिवसात भारतात तब्बल २४९५ रुग्णांची वाढ झाली. तर, २ दिवसात एक हजारहून जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली. ही आकडेवारी भारतासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. याचे कारण म्हणजे लॉकडाऊनच्या काळात ही संख्या झपाट्याने वाढत असल्याच, लॉकडाऊननंतर यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!