Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirus Update : औरंगाबादमध्ये तिसरा पॉझिटिव्ह तर लातुरात सापडले ८ रुग्ण , महाराष्ट्रात ३७ रुग्णांची भर ….

Spread the love

महाराष्ट्रात नव्याने  आढळलेल्या रुग्णांमध्ये औरंगाबाद शहरातील एक मुंबईतील २८, ठाणे जिल्ह्यातील १५, पुण्यातील दोन, अमरावती व पिंपरी-चिंचवडमधील एकाचा तर लातूर जिल्ह्यातील नव्याने आढळलेल्या ८ रुग्णांचा समावेश आहे. देशातील अन्य राज्यांशी तुलना करता करोनाबाधितांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. त्यातही मुंबईचा पहिला क्रमांक आहे. मुंबईत कालपर्यंत २७८ रुग्ण होते. आज त्यात आणखी ३७ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळं राज्यातील  हा आकडा आता ५३७ झाला आहे. राज्यात आतापर्यंत २७ जणांचा करोनामुळं मृत्यू झाला आहे.

औरंगाबाद शहरातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता तीन वर गेली आहे तर लातूरमध्ये ८ रुग्ण आढळून आले आहे. औरंगाबाद शहरातील आरेफ कॉलनीमध्ये आढळलेल्या करोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या वडिलांच्या स्वॅब चाचणीचा अहवालही पॉझिटिव्ह आला असल्याचे वृत्त आहे. दरम्यान औरंगाबादेतीलच  सिडको एन ४ मधील करोना बाधित महिलेच्या पतीचा तपासणी अहवाल मात्र निगेटिव्ह आला आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेनं आजपासून आणखी १० ठिकाणी करोना संशयितांची तपासणी करण्यासाठी दवाखाने सुरू केले आहेत. प्रामुख्याने दाट लोकवस्तीच्या व ‘कंटेनमेंट झोन’ लगतच्या परिसरात हे दवाखाने आहेत. सकाळी ९ ते दुपारी १ या चार तासांच्या कालावधीत हे दवाखाने सुरू राहणार आहेत. इथं एक डॉक्टर आणि एक परिचारिका असा स्टाफ असणार आहे.

दरम्यान लातूर जिल्ह्यामध्ये आज तब्बल ८ कोरोना  रुग्ण आढळून आल्याचे वृत्त असून या वृत्तामुळे लातूर मध्ये खळबळ उडाली आहे. लातूरमध्ये आढळून आलेले हे रुग्ण जमातमध्ये सामील झालेले होते हे सर्वजण निलंगा येथील दर्ग्यात २ एप्रिल रोजी मुक्कामास थांबले होते. हि माहिती मिळताच शुक्रवारी त्यांना जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी हलवण्यात आले होते.  विशेष म्हणजे त्यांच्यामध्ये कोरोनाचे कुठलेही लक्षण दिसून आले नव्हते मात्र तपासणीनंतर या आठही जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे सांगण्यात येत आहे.  लातूर येथून काल २० संशयीत रुग्णांचे चे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी आठ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

विशेष म्हणजे आज पर्यंत लातूर जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नव्हता मात्र जमात निमित्ताने आलेल्या लोकांपैकी ८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. हे लोक तेलंगणातील नंदियाल जिल्ह्यातील असून ते १२ एप्रिल रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातून लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील दर्ग्यामध्ये मुक्कामाला थांबलेले होते. जिल्हा प्रशासनाला ही माहिती मिळाल्यानंतर त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते या बारा जणांचे तपासणीसाठी
दरम्यान पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले की हे लोक हरियाणामधील फिरोजपुर जिल्ह्यातील जर का येथे वास्तव्यास होते त्यांच्यामध्ये कुठल्याही ही आजाराचे लक्षण नव्हते द्वारका ते नंदियाल पर्यंत यांच्या प्रवासाचा पास होता रुग्ण आढळल्यास या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आरोग्य विभाग आणि महानगरपालिका यांनी तातडीने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे आठही रुग्णांचे विलगीकरण कक्षात स्थानांतर करण्यात आलेले असून हरियाणा ते हरियाणातील झिर्का ते लातूर जिल्ह्यातील निलंगा प्रवासात त्यांनी कुठे कुठे मुक्काम केला आणि त्यांच्या संपर्कात कोण कोण आले होते याची चौकशी चालू आहे चालू असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान लातूर जिल्ह्यात आठ कोरणाचे रुग्ण आढळल्यानंतर लातूर महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. महापौर विक्रम  गोजमगुंडे यांनी या प्रकरणात योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले आहेत..

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!