Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : राज्यातील रुग्णांची संख्या १२२ पण १४ रुग्ण पूर्णतः बरे , धीर धरा , घरातच रहा : राजेश टोपे

Spread the love

राज्यात करोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यात करोनाचे १२२ रुग्ण झाले आहेत. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरच्या माध्यमातून तपशील दिला. राज्यातील करोना रुग्णांची संख्या ११६ वरून १२२ इतकी झाली आहे. आज सकाळी सांगली येथील एकाच कुटुंबातील ५ सदस्यांना संसर्गातून करोनाची लागण झाल्याचे आढळून आले. त्यानंतर मुंबईत पाच नवीन रुग्ण आढळले आहेत तर ठाण्यात आणखी एक करोनाचा रुग्ण आढळल्याने चिंतेत भर पडली आहे.

महाराष्ट्रात आज दुपारपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ११६ इतकी होती. आज सांगली येथील एकाच कुटुंबातील ५ सदस्य संसर्गातून बाधीत आढळून आले होते तर मुंबईत ४ रुग्ण आढळून आले होते. दुपारनंतर त्यात आणखी सहा जणांची भर पडली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या १२२ पर्यंत पोहचली आहे.

दरम्यान, करोनाचे १४ रुग्ण आता पूर्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्याच्या प्रक्रिया सुरू आहे. दुसरीकडे पुण्यात सर्वप्रथम करोनाबाधित आढळलेलं दाम्पत्य आज बरे होऊन आपल्या घरी परतले आहे. नायडू रुग्णालयात या दाम्पत्यावर उपचार सुरू होते. या दाम्पत्याने एक निवेदन काढून नायडू रुग्णालयातील संपूर्ण स्टाफ, राज्य सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या सर्वांचेच आभार मानले आहेत. या संकटकाळात सर्वांनीच सरकारला सहकार्य करावे, असे आवाहनही या दाम्पत्याने केले आहे.

महाभयंकर कोरोनाव्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. चीनच्या वुहानपासून सुरू झालेल्या विषाणूनचे जगातील तब्बल १७५ देशांना विळखा घातला. प्रत्येक देश कोरोनापासून वाचण्यासाठी उपाययोजना करत आहे. यामुळं सध्या जवळजवळ संपर्ण जग लॉक डाऊन झाले आहे. जगभरात कोरोनामुळे 18 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत १७५ देशांमध्ये ४ लाख २२ हजार ८२९ हून अधिक रुग्णांची पुष्टी झाली आहे. मात्र असे असले तरी जगभरात जवळ जवळ १ लाख ०९ हजार १०२ लोकं निरोगी झाले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!