Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : कस्तुरबा रुग्णालयात कर्तव्य बजावणारा पोलिसही झाला कोरोना संशयित …

Spread the love

देशात आणि राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून राज्यात सध्या ७४५२ लोक घरगुती विलगीकरणात ( होम क्वारंटाईन) आहेत. दरम्यान कस्तुरबा रुग्णालयात बंदोबस्ताला असलेला पोलीस कर्मचारीही कोरोना  संशयित असल्याचे  आढळून आले  आहे. डॉक्टरांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं आहे. कस्तुरबा रुग्णालयात भरती असलेले ५ रुग्ण करोना बाधित आढळले आहेत. यातील २ रुग्णांनी अमेरिकेचा तर प्रत्येकी एकाने स्कॉटलंड, तुर्कस्थान आणि सौदी अरेबिया येथे प्रवास केलेला आहे. या ५ रुग्णांपैकी १ रुग्ण ऐरोली, नवी मुंबई येथील आहे. दुसरीकडे राखीव पोलीस दलातील पोलीस शिपाई गेल्या पाच दिवसांपासून कस्तुरबा रूग्णालयात कर्तव्यावर आहे. सर्दी, घशाची खवखव होऊ लागल्याने त्यांची डॉक्टरांनी तपासणी केली. लक्षणे आढळल्याने डॉक्टरांनी त्यांना रूग्णालयात दाखल करून घेतले.

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार अतिजोखमीच्या देशातून येणाऱ्या प्रवाशांना संस्थात्मक पातळीवर क्वारंटाईन करण्यात येत असून, ७९१ जणांना विविध क्वारंटाईन संस्थांमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यापैकी २७३ जणांना घरगुती क्वारंटाईन करता सोडण्यात आले आहे. सध्या ५१८ प्रवासी क्वारंटाईन संस्थामध्ये आहेत. राज्यात सध्या ७४५२ लोक घरगुती विलगीकरणात ( होम क्वारंटाईन) आहेत. लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात १८७६ जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी १५९२ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत, तर ७४ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

दरम्यान कस्तुरबा रुग्णालयात भरती असलेले ५ रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत. यातील २ रुग्णांनी अमेरिकेचा तर प्रत्येकी एकाने स्कॉटलंड, तुर्कस्थान आणि सौदी अरेबिया येथे प्रवास केलेला आहे. या ५ रुग्णांपैकी १ रुग्ण ऐरोली, नवी मुंबई येथील आहे. काल रात्री एच.एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये एका ६३ वर्षीय पुरुषाचा या आजाराने मृत्यू झाला. हा रुग्ण १९ मार्च २०२०रोजी रुग्णालयात भरती झाला होता. या रुग्णास मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदय रोग हे आजारही होते. सुमारे १२ वर्षांपूर्वी त्याची ॲन्जिओप्लास्टी झालेली होती. राज्यातील शहरी भागात आज मध्यरात्रीपासून जमावबंदीचे आदेश लागू असून, उद्या पहाटे पाचपर्यंत जनता संचारबंदी वाढवण्यात आली आहे. नागरिकांनी करोनाला आळा घालण्यासाठी मीच माझा रक्षक या संदेशाचे पालन करावे.

दोन दिवसांपूर्वी पुण्यातील भारती विद्यापीठ रुग्णालयात कोणताही परदेशी प्रवासाचा इतिहास नसलेली जी ४१ वर्षीय महिला कोरोना बाधित आढळली, तिचे चार जवळचे नातेवाईक आज कोरोना बाधित आढळून आले. राज्यात १० नवीन करोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी पुणे येथील ४, मुंबईचे ५ तर नवी मुंबई येथील १ रुग्ण आहे. राज्यातील बाधित रुग्णांची संख्या ७४ झाली आहे. एच एन रिलायन्स रुग्णालयात भरती झालेल्या करोना बाधित ६३ वर्षीय रुग्णाचा आज मृत्यू झाला. हा राज्यातील दुसरा मृत्यू आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!