Aurangabad : सांवगी येथे जनता कर्फ्युचे उलघंन करणारे मंगल कार्यालय चालक आणि वधू – वर पित्यांवर गुन्हा दाखल.

Advertisements
Advertisements
Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी २२ तारखेला जनता कर्फ्यू चे आवाहन केलेले असतानाही फुलंब्री पोलीस ठाण्याच्या  हद्दीतील हर्सूल – सांवगी रोड वरील आई साहेब मंगल कार्यालयात मोठ्या थाटात रविवार (दि. 22) रोजी सायंकाळी साडे सात वाजता विवाह सोहळा पार पाडण्यात आल्याची घटना घडली आहे. त्यामुळे जनता कर्फ्यु चे उलघंन झाल्या प्रकरणी मंगल कार्यालय आणि वधू – वर पितांनावर फुलंब्री पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची  माहिती पोलिस निरीक्षक सम्राटसिॅग राजपूत यांनी दिली.

Advertisements

या विषयी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि , आरोपी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक कल्याण चाबुकस्वार हे शहर पोलिसांचे कर्मचारी असल्यामुळे त्यांच्या या प्रकरणाचा अहवाल पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी पोलिसआयुक्त चिरंजीव प्रसाद यांना पाठवला आहे.ते मंगळवारी या प्रकरणी काय कारवाई करायची याचा निर्णय घेतील अशी माहिती मोक्षदा पाटील यांनी दिली आहे.

Advertisements
Advertisements

सध्या जगभरात कोरोना सारख्या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले असून त्याने भारतातही आपले हातपाय पसरवले आहे. त्यात भारतामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त रुग्ण आढळून आल्याने नागरिक भयभीत झाले आहेत शहरी भागात सध्या या आजाराचे रुग्ण असून ग्रामीण भागात हा व्हायरस येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वत्र जनता कर्फ्यु लागू केला होता. याच दरम्यान फुलंब्री पोलीस ठाणे हद्दीतील सांवगी ( ता. औरंगाबाद) येथे सायंकाळी साडेसात वाजता आई साहेब मंगल कार्यालयात कल्याण माधवराव चाबुकस्वार रा. पिंपळवाडी ता. पैठण यांची कन्या रतीका – प्रल्हाद साळवे रा. बिल्डा ता. फुलंब्री यांचा मुलगा राजेश चा विवाह सोहळा पार पडला.
या चाबुकस्वार परिवार – साळवे परिवाराच्या विवाह सोहळ्याला सुमारे ८०० नागरिक उपस्थित होते. त्यामुळे जनता कर्फ्युचे उलघंन झाल्या प्रकरणी मंगल कार्यालयाचे मालक सुखदेव उत्तम रोडे रा. सांवगी यांच्यासह वधू – वर पित्यांवर कलम जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

आपलं सरकार