Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronoaVirusUpdate : कनिका कपूरच्या भेटीगाठीमुळे वसुंधरा राजे , त्यांचे पूत्र खा. दुष्यन्तसिंह आणि संसदही हादरली !!

Spread the love

देशात सर्वत्र कोरोनाची भीती कायम असताना बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूर हिला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कनिका कपूरला भेटलेल्यांमध्ये राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या पुत्र आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार दुष्यंत सिंह यांचा समावेश आहे. कनिकाला भेटल्यानंतर दुष्यंत सिंह गुरुवारी आणि शुक्रवारी संसदेत आले होते. हे लक्षात घेता संसदेचे अधिवेशन स्थगित करावे अशी मागणी टीएमसीचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी केली आहे. दुष्यंत सिंह संध्या क्वारंटाइनमध्ये आहेत. कनिका कपूरने रविवारी लखनऊमझील गॅलेंट अपार्टमेंटमध्ये एका पार्टीचे आयोजन केले होते. यात पार्टीला नेते आणि बडे अधिकारी सहभागी झाले होते. दुष्यंत सिंह हे कनिकाच्या पार्टीत सहभागी झाल्याचे समजल्यावर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. कनिका लखनऊच्या ताज हॉटेलमध्येही थांबली होती, अशी माहितीही मिळत आहे.

दरम्यान संसदेचे अधिवेशन स्थगित करण्याची मागणी करणारे टीएमसीचे खासदार दोन दिवसांपूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत दुष्यंत सिंह हे खासदार डेरेक ओ ब्रायन यांच्या बाजूलाच बसले होते. दुष्यंत सिंह यांनी संसदेत अनेक खासदारांची भेट घेतली. ते सेंट्रल हॉलमध्येही वावरले. दुष्यंत सिंह आता क्वारंटाइनमध्ये आहेत अशी माहिती लोकसभेत त्यांच्या बाजूला बसलेले खासदार निशिकांत दुबे यांनी दिली आहे.

देशभरात करोनाचा संसर्ग वाढत असताना संसदेचे अधिवेशन सुरूच आहे. अशा परिस्थितीत अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत. या पूर्वीच काही खासदारांनी संसदेचे अधिवेशन स्थगित करण्याची मागणी केली आहे. मात्र, संसदेते अधिवेशन ३ एप्रिलपर्यंत सुरू राहणार असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे. कनिका कपूर १५ मार्चला लंडनहून लखनऊला पोहोचली होती. मिळालेल्या माहितीनुसार, विमानतळावर ती ग्राउंडस्टाफशी संगनमत करून वॉशरूममधून गुपचूप निसटली. त्यानंतर रविवारी तिने लखनऊच्या गॅलेंट अपार्टमेंटमध्ये पार्टी आयोजित केली. या पार्टीत नेते आणि मोठे अधिकारी सहभागी झाले होते.

वसुंधरा राजेही विलगीकरणात

दरम्यान गायिका कनिका कपूरने लखनौमध्ये उपस्थिती लावलेल्या एका पार्टीने प्रत्येकाची धाकधूक वाढवली आहे. कनिका कपूरला करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. भाजप नेत्या आणि राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजेही या पार्टीला उपस्थित होत्या. त्यांचे चिरंजीव खासदार दुष्यंत सिंह देखील पार्टीला होते. कनिका कपूर करोनाबाधित असल्याचं समोर आल्यानंतर वसुंधरा राजे आणि दुष्यंत सिंह यांनी स्वतःला विलगीकरणात ठेवलं आहे. कनिका कपूर १५ मार्च रोजी एका पार्टीत सहभागी झाली होती. बसपा नेते अकबर डंपी यांनी ही पार्टी आयोजित केली असल्याची माहिती आहे. त्यांनी एक पार्टी आपल्या घरी आणि दुसरी पार्टी ताज हॉटेलमध्ये दिली होती. या पार्टीला विविध नेत्यांची उपस्थिती असल्याची माहिती आहे. यामध्ये उत्तर प्रदेश सरकारमधील काही जण असल्याचाही दावा केला जातो आहे.

कनिका कपूर लखनौसह कानपूरमध्ये तिच्या नातेवाईकांच्या घरी एका पार्टीलाही गेली होती. कनिका कपूर यांचे नातेवाईक संजय टंडन यांच्या मते, घरभरणीच्या कार्यक्रमासाठी १५ ते २० जणांची उपस्थिती होती. कनिका कपूरला करोनाची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनाही विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. तिने या आजाराचे लक्षणं लपवले, शिवाय लंडनहून आल्यानंतर विमानतळावर स्क्रीनिंग केली नसल्याचा तिच्यावर आरोप आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!