Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मराठवाड्यातील ज्येष्ठ साहित्यिक भगवानराव देशमुख याचे निधन

Spread the love

प्रसिद्ध कवी-कथाकार प्राचार्य भगवानराव देशमुख (वय ८५) यांचे शनिवारी दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले.  मराठवाडा गीतामुळे देशमुख यांची मराठी साहित्य विश्वात मोठी ख्याती होती. भगवानराव देशमुख यांच्यावर सोयगाव येथे रविवारी (१ मार्च) सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. ‘संत महंताची भूमी माझी मराठवाड्याची, भोळीभाबडी माणसं लय पुण्यवान माती’ हे मराठवाडा गीत विशेष लोकप्रिय ठरले होते. विद्यार्थीप्रिय प्राचार्य म्हणूनही देशमुख ओेळखले जात होते. मराठवाडा साहित्य परिषदेच्या विविध वाड्मयीन उपक्रमात देशमुख यांचा सहभाग होता.

भगवानराव देशमुख सोयगाव येथील संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात प्राचार्य होते. मराठी साहित्यात कथा व कविता लेखनाद्वारे त्यांनी मोलाची भर घातली. कथा सांगण्याच्या खुमासदार शैलीमुळे देशमुख राज्यभर लोकप्रिय होते. विशेषत: ऐंशी-नव्वदच्या दशकात शेकडो कविसंमेलने आणि कथाकथनाचे कार्यक्रम त्यांनी गाजवले. मात्र, त्यांच्या नावावर एकही कथासंग्रह किंवा कवितासंग्रह नाही. मंचावर कथाकथन झाल्यानंतर त्यांनी ती कथा पुन्हा सांगितली नाही. त्यामुळे कथासंग्रह प्रकाशित होऊ शकला नाही. ग्रामीण भागातील निसर्ग, स्त्रियांचे भावविश्व आणि प्रेमाची अभिव्यक्ती असलेल्या उत्तमोत्तम कविता देशमुख यांनी लिहिल्या.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!