Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राज्यसभेच्या रिक्त जागांवर महाराष्ट्रातून “यांची” लागतेय वर्णी , राष्ट्रवादीचे दोन उमेदवार ठरले…

Spread the love

महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या सात खासदारांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपत असून  या सातही जागांसाठी येत्या २६ मार्च रोजी निवडणूक होणार आहे. या चार जागा या महाविकास आघाडीच्या वाट्याला येत असून दोन जागा भाजपच्या वाट्याला येत आहेत. त्यापैकी दोन जागा राष्ट्रवादीकडे आल्या आहेत. शिवसेना आणि काँग्रेसच्या वाट्याला प्रत्येकी एक जागा आली असून त्यांनी अद्याप राज्यसभेचा उमेदवार जाहीर केलेला नाही. तर भाजपकडून रिपाइंचे नेते रामदास आठवले यांना पुन्हा राज्यसभेची उमेदवारी देण्याचे निश्चित करण्यात आले असले तरी  दुसऱ्या जागेसाठी भाजपचे सहयोगी उमेदवार संजय काकडे कि उदयनराजे भोसले यांच्यापैकी भाजप नेमकी कोणाला उमेदवारी देणार हे अद्याप अनिश्चित आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मंत्री फौजिया खान यांना राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यसभेसाठी उमेदवारी दिली असल्याचे वृत्त आहे . काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ही महाविकास आघाडी प्रथमच राज्यसभेची निवडणूक एकत्र लढणार असल्याने पवार आणि खान यांचा राज्यसभा निवडणुकीतील विजय सोपा मानला जात आहे.

महाराष्ट्रातून साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले व विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची नावे चर्चेत आहेत. त्यापैकी आठवले यांनी आज विधान भवनात येऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व अन्य नेत्यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना, त्यांनी राज्यसभेसाठी भाजपकडून आपली उमेदवारी नक्की असल्याचं सांगितलं. ‘मी केंद्रात राज्यमंत्री असल्यानं माझी उमेदवारी निश्चित आहे, असे  भाजपच्या नेत्यांनी मला सांगितले आहे. भाजपकडून माझ्या नावाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर मी अर्ज भरेन,’ असं त्यांनी सांगितलं.

दुसऱ्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेले व लोकसभेच्या पोटनिवडणुकीत पराभूत झालेले माजी खासदार उदयनराजे भोसले यांना भाजपकडून संधी दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र, या जागेसाठी राज्यसभेतील भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे आग्रही आहेत. ‘भाजपनं मला मेरिटवर संधी द्यायला हवी. उदयनराजेंचं भाजपमध्ये फारसं योगदान नाही,’ असं त्यांनी या आधीच म्हटलं आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेकडून कोणाला उमेदवारी मिळणार ? या प्रश्नाचे उत्तर शोधले जात आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!