Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

व्हाट्सऍपवर पाठवत होते बारावीचे पेपर , पोलिसांनी ८ जणांना घेतले ताब्यात…

Spread the love

जालना जिल्ह्यातील परतूरमध्ये बारावी परीक्षेचा पेपर व्हाट्सऍप वरून फोडल्या प्रकरणी  एका शिक्षकासह आठ जणांना ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे. या घटनेतील हा शिक्षक जवळच्या झेरॉक्स सेंटर चालकाला व्हॉट्सअॅपवरून प्रश्नपत्रिका पाठवत होता. तसेच तिथून काही जणांचा गट विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्याचे काम करायचा. बारावीची प्रश्नपत्रिका व्हॉटसअॅपवरुन बाहेर पाठवल्या जात असल्याची माहिती मिळताच आयपीएस अधिकारी निलेश तांबेंसह परतूर पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाल्या. तसेच पेपर फोडल्याप्रकरणी ८ जणांच्या विरोधात परतूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याविषयीची अधिक माहिती अशी कि , परतूर तालुक्यातील लालबहाद्दूर शास्त्री महाविद्यालयातून बारावीच्या प्रश्नपत्रिका व्हॉटसअॅपवरुन बाहेर पाठवल्या जात असल्याचे माहिती पोलिसांना कळाली. तसेच यात एका शिक्षकाचा समावेश असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी शिक्षकासह ८ जणांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात बारावीची परीक्षा सुरु असताना हॉल क्रमांक २० वरील पर्यवेक्षकासमोरच या शिक्षकाने प्रश्नपत्रिकेचे मोबाईलवर फोटो काढले. बारावीच्या हिंदी विषयाची प्रश्नपत्रिका बाहेर आणून त्याची उत्तरे लिहिली गेली. त्यानंतर झेरॉक्स मशीनमध्ये त्याच्या प्रति काढून विद्यार्थ्यांना पुरवण्यात आल्याचे समजत आहे.

या प्रकरणी पोलिसांनी भादंवी 188 कलम 5, 6, 7 महाराष्ट्र विद्यापीठ बोर्ड गैरव्यवहार प्रतिबंध अन्वये  गुम्हा दाखल केला असून ताब्यात घेतलेल्या ८ जणांमध्ये कृष्णा साळूदात चव्हाण (वय १९), दिनेश अंकुशराव तेलगड (वय ३४), रामेश्वर बाबासाहेब उबाळे (वय २२), विषवभर शंकरराव पाष्टे (वय १९), श्याम दत्तात्रय उबाळे (वय १९), शुभम सुधाकर मुळे (वय १८), ज्ञानेश्वर सूंदरराव माने (वय १८) यांचा समावेश असून यांच्यासह परीक्षा हॉल क्रमांक २० च्या पर्यवेक्षकालाही अटक करण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!