कमल हसन यांच्या सिनेमाच्या सेटवर अपघात , सहाय्यक दिगदर्शकासह तिघांचा मृत्यू

Advertisements
Advertisements
Spread the love

चेन्नईच्या ईवीपी स्टूडिओमध्ये सुपरस्टार कमल हसन यांच्या सिनेमाच्या शुटिंगदरम्यान सेटवर भीषण अपघात झाला आहे. क्रेनच्या अपघातामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, क्रेन कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात १० लोक जखमीही झाले आहेत. वृत्तानुसार, कमल हासन रुग्णालयात पोहोचून लोकांची काळजी घेत आहे. हा भीषण अपघात झाला तेव्हा तो त्या ठिकाणी उपस्थित होते.

Advertisements

या अपघातात मधु (२९), दिग्दर्शक शंकर यांचे वैयक्तिक संचालक), कृष्णा (३४) (सहाय्यक डायरेक्टर) आणि एक कर्मचारी चंद्रन (६०) यांचा मृत्यू झाला आहे. खरंतर एस. शंकर हा सिनेमा दिग्दर्शित करत आहेत. या सिनेमाविषयी बरीच चर्चा आहे.  जेव्हा हा अपघात झाला तेव्हा इंडियन 2 या सिनेमाचं शूटिंग ईवीपी एस्टेट स्पॉटवर सुरू होतं. हा अपघात १९ फेब्रुवारीच्या रात्री ९.३०च्या सुमारास झाला.

Advertisements
Advertisements

नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रसिद्ध झाले. या सिनेमाच्या पोस्टरमध्ये कमल हसन एका वयस्कर व्यक्तीची भूमिका साकारताना दिसत आहेत. हा सिनेमा १९९६ मधील कमला हसन यांच्या इंडियन सिनेमाचा सीक्वल आहे. हा सिनेमा ‘लिका’च्या बॅनरखाली बनवला जात आहे. त्यात सिद्धार्थ आणि काजल अग्रवालही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. विशेष म्हणजे हा सिनेमा कमल हसन यांचा शेवटचा सिनेमा असू शकतो. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, आपण अभिनय क्षेत्र सोडत आहोत. कमल हसन यांनी राजकरणात सक्रिय होण्याची भूमिका घेतली असल्याने  राजकारण आणि अभिनय दोन्ही एकत्र काम करणे शक्य नसल्याचे त्यांचे मत आहे. त्यामुळे त्यांचा हा अखेरचा सिनेमा असावा अशी चर्चा आहे.

आपलं सरकार