Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : चाईल्ड पोर्नोग्राफी प्रकरणात जिन्सी पोलिसांनी घातल्या दोघांना बेड्या

Spread the love

औरंगाबाद – नॅशनल क्राईम रेकाॅर्डच्या सूचनेवरुन व सायबर पोलिस ठाण्याच्या फिर्यादीवरुन जिन्सी पोलिसांनी दोघांना चाईल्ड पोर्नोग्राफी प्रकरणात बेड्या ठोकल्या. सय्यद अकबर सय्यद हाजी (३६) रा.रशीदपुरा हीनानगर आणि विजय विनायक सरोदे (३६) रा. संजयनगर अशी अटक आरोपींची नावे आहेत. वरील आरोपींनी चाईल्ड पोर्नोग्राफी चे व्हिडीओ सोशल मिडीयावर अपलोड केले होते.
दिल्ली मधे काही दिवसांपूर्वी केंद्रशासनाने नॅशनल क्राईम रेकाॅर्ड ब्युरो या समितीची स्थापना केली आहे. ही समिती देशभरातील सोशल मिडीयावर अल्पवयीन मुलांचे व्हिडीओ अपलोड करणार्‍या विकृतांची माहिती संबंधित पोलिसआयुक्तालयातील सायबर पोलिस ठाण्याला कळवते.त्यानंतर या प्रकरणात आरोपींना अजामीनपात्र अटक केली जाते.नॅशनल क्राईम रेकाॅर्ड ब्युरोने दोन दिवसांपूर्वी सायबर पोलिस ठाण्याला औरंगाबादेतील वरील आरोपींनी चाईल्ड पोर्नोग्राफीचे व्हिडीओ फेसबुकवर अपलोड केल्याची माहिती दिली.त्यानंतर सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कैलास देशमाने यांच्या आदेशावरुन सायबर पोलिस ठाण्याचे कर्मचारी सुशांत शेळके आणि मन्सेर इब्राहिम शहा यांच्या फिर्यादीवरुन जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच जिन्सी पोलिसांनी सय्यद अकबर आणि विजय सरोदे ला अटक केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय. दत्ता शेळके करंत आहेत

आपलं सरकार

Click to listen highlighted text!