Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

बातमीचा पाठलाग : राजकिय पक्षाच्या उपाध्यक्षाचा कुरिअर मॅनेजरच्या खुनात सहभाग, प्रोटेक्शन मनी देणे बंद केल्यामुळे खून

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – मयत प्रकाश पटेल कडून राजकिय पक्षाचा उपाध्यक्ष प्रोटेक्शन मनी व पोलिसांना हप्ते देण्यासाठी लागणारा पैसा देणे बंद झाल्यामुळे प्रकाश पटेल यांचा खातमा असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली आहे. खुनाविषयीचा प्राथमिक माहिती मिळताच पोलिसांची कारवाई अधिक गतिमान झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Advertisements

प्रकाश पटेल यांचा खून झाल्यानंतर बर्‍याच पोलिस अधिकार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. प्रकाश पटेल रामुभाई मोहनलाल या कुरीअर सर्व्हिस कंपनीत गेल्या एक वर्षांपासून काम करंत होते. ही कुरीअर सर्व्हिस हवालाचे व्यवहार राजकिय पक्षाच्या आणि पोलिसांच्या आर्शिवादाने बिनधास्तपणे करते. त्याबदल्यात कुरीअर कंपनीकडून संबंधितांना ठराविक मोबदला जात होता अशी माहिती आहे. यांच्याकडून शहरातील गणेशोत्सव , नवरात्र या सणासाठी भरघोस दक्षिणाही जात होती. परंतु दरम्यानच्या काळात  प्रकाश पटेल यांनी राजकिय पक्षाच्या उपाध्यक्षाला जुमानले नाही त्यांची समजूत काढण्यासाठी प्रयत्न करुन थकल्यानंतर उपाध्यक्षांनी त्याचा खातमा करण्याचे पाऊल उचलल्याचे सुत्रांना कळाले. पोलीस त्यांना मिळालेल्या माहितीची खातरजमा करून पुढील कारवाई करीत असल्याचे सांगण्यात येत आहेत.

Advertisements
Advertisements

दरम्यान या प्रकरणाचा लवकरच पर्दापाश होईल अशी खात्री वरिष्ठ अधिकाऱ्यांना आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!