Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सर्वोच्च न्यायालयाने पवनकुमारची याचिका फेटाळली , निर्भया कांडातील आरोपींना उद्या फाशी नाही , पतियाळा कोर्टाचा निर्णय

Spread the love

सर्वोच्च न्यायालयाने निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील  एक दोषी पवनकुमार गुप्ता याची याचिका फेटाळल्याने या सर्वांना उद्या दि. १ फेब्रुवारी रोजी  फाशी  शक्यता होती मात्र दिल्लीच्या पतियाळा कोर्टाने उद्या होणारी हि फाशी अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात  आली आहे त्यामुळे  उद्याही आता फाशी दिली जाणार नाही.

दरम्यान या प्रकरणातील दोषी मुकेश व्यतिरिक्त इतर तीन दोषींकडे अद्यापही राष्ट्रपतींना दया याचिका पाठविण्याचा पर्याय उपलब्ध आहे. दोषी विनयने राष्ट्रपतींकडे दया याचिका पाठवली आहे. जर राष्ट्रपतींनीही दया याचिका फेटाळली तर तिघेही मुकेश प्रमाणे या निर्णयाची न्यायिक समीक्षा घेऊन सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात. निर्भयाच्य़ा दोषींचे वकील एपी सिंह यांच्याकडून पतियाळा हाऊस न्यायालयात अर्ज दाखल करुन फाशीची तारीख पुन्हा एकदा वाढवण्याची मागणी केली होती . दोषींकडून यंदा दिल्ली प्रिजन नियमांचा हवाला देण्यात आला आहे. निर्भयाच्या सर्व दोषींचे वकील एपी सिंह यांच्याकडून ही याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये दिल्ली तुरुंगातील संबंधित नियमांचा हवाला देण्यात आला आहे. एपी सिंह यांनी याचिकेत दिल्ली प्रिजन नियमांचा उल्लेख करीत म्हटले आहे, की चारपैकी कोणत्याही दोषींना तेव्हापर्यंत फाशी दिली जाऊ शकत नाही जोपर्यंत शेवटच्या दोषीचा दया याचिकांसह सर्व कायदेशीर पर्यायांचा वापर केला जात नाही.

बुधवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना विनयने दया याचिका पाठवली आहे. दोषी विनयची पुनर्विचार याचिका यापूर्वीच फेटाळण्यात आली आहे. राष्ट्रपतींनी दोषी मुकेश सिंह याची दया याचिका १७ जानेवारी रोजी फेटाळली होती. या निर्णयाची न्यायिक समीक्षेची याचिकादेखील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. अशा परिस्थितीत मुकेशकडे फाशीची शिक्षा वाचवण्यासाठी दुसऱा पर्याय उपलब्ध नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!