Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

निर्भयाच्या आरोपींची फाशी लांबणीवर पडल्याने , आई-वडिलांनी दिली “हि” प्रतिक्रिया…

Spread the love

दिल्लीच्या पतियाळा कोर्टाने निर्भया बलात्कार आणि हत्याकांडातील आरोपींची  फाशी पुन्हा एकदा पुढे ढकलल्याने  निर्भयाची आईने संतप्त भावना व्यक्त केली असून त्यांनी म्हटले आहे कि ,  ७ वर्षांपूर्वी माझ्या मुलीवर अत्याचार झाला. सरकार वारंवार मला त्या आरोपींसमोर झुकवण्याचा प्रयत्न करत आहे. माझा कायद्यावर विश्वास आहे. मात्र जे काही सध्या सुरू आहे, त्यामुळे आरोपींना बळ मिळत आहे. जर असेच होणार असेल तर आग लावा त्या नियम आणि कायद्यांच्या पुस्तकांना….

दरम्यान एका वृत्तसंस्थेशी बोलताना निर्भयाच्या वडिलांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर फाशीला विलंब होण्याचे खापर फोडले आहे. ‘कोर्टाने हे प्रकरण पुढे ढकलल. ही सुनावणी किती दिवस लांबणीवर राहील हे माहीत नाही. याचा अर्थ केजरीवाल यांनीच हे काम केलं आहे. केजरीवाल यांच्या हातात तुरुंग प्रशासन आहे. तिथूनच सर्व काम थांबलेलं आहे. संपूर्ण सिस्टिम केजरीवाल यांच्या हातात आहे,’ असं निर्भयाच्या वडिलांनी सांगितले तर त्यांच्या या वक्तव्याचा आधार घेताना  भाजप नेते कपिल मिश्रा यांनी केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. निर्भयाच्या आईच्या डोळ्यांतून निघणारा प्रत्येक अश्रू आणि त्यांची हाय केजरीवालला भस्म करेल, असं मिश्रा यांनी म्हटलं आहे. तर अकाली दलाचे नेते मजिंदर सिंह सिरसा यांनी याप्रकरणी केजरीवाल यांचा धिक्कार केला आहे.

मला आरोपीच्या वकिलांनी आधीच सांगितले होते…

दिल्लीतील पतियाळा हाउस कोर्टाने निर्भयाच्या दोषींच्या ‘डेथ वॉरंट’वर पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे. त्यामुळे उद्या १ जानेवारी रोजी होणारी दोषींची फाशी दुसऱ्यांदा लांबणीवर गेली आहे. त्यामुळे निर्भयाची आई आशा देवी या प्रचंड संतापल्या आहेत. कोर्टाबाहेर मीडियाशी संवाद साधताना अश्रूंना वाट करून देत आपला आक्रोश व्यक्त केला. दोषींची फाशी अनंत काळासाठी लांबणीवर पडेल, असं दोषींच्या वकिलांनी मला आधीच सांगितलं होतं, असं निर्भयाच्या आईने सांगितलं. दोषींचे वकील ए. पी. सिंहने मला हे आव्हान दिलं होतं. दोषींची फाशी अनंत काळासाठी लांबणीवर टाकून दाखवतो, असं ते म्हणाले होते. सात वर्षांपूर्वी माझ्या मुलीवर अत्याचार झाला. आता सरकार मला आरोपींसमोर झुकवण्याचा प्रयत्न करत आहे. पण माझी लढाई मी सुरूच ठेवीन, असं त्या म्हणाल्या.

निर्भयाची आई पुढे म्हणाली कि , कायद्यातील त्रुटीमुळे या वकिलाने मला फाशी अनंतर काळापर्यंत लांबणीवर टाकण्याचं आव्हान दिलं. दोषींना जे हवं होतं. तेच झालं. फाशी लांबणीवर गेली पण  मी लढतच राहणार आणि दोषींना फाशी द्यावीच लागेल. मी लढणार. कोर्टाला फाशी द्यावीच लागेल. नाही तर केवळ दिशाभूल करण्यासाठी फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. सर्वांना शांत करण्यासाठीच ही शिक्षा सुनावण्यात आली होती, असं सर्वोच्च न्यायालयापासून कनिष्ठ कोर्टापर्यंत सर्वांना कबुली द्यावी लागेल, असं सांगतानाच माझा कायद्यावर संपूर्ण विश्वास आहे. मात्र जे काही होत आहे, त्यामुळे आरोपींचं फावणार आहे. जर असेल व्हायचं असेल तर नियम आणि कायद्यांच्या पुस्तकांना आगी लावल्या पाहिजेत, असा आकांतही त्यांनी केला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!