Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पत्नीने शेव भाजी करून दिली नाही म्हणून पतीने धरला १७ वर्षे अबोला , शेवटी न्यायालयाच्या आदेशाने तिने भाजी केली आणि निर्माण झाला गोडवा !!

Spread the love

पत्नीने शेवेची भाजी केली नाही म्हणून रागावलेल्या पतीने घर सोडून तब्बल १७ वर्ष अबोला धरला. अखेरीस न्यायालयासमोर हे प्रकरण आल्यानंतर, न्यायाधीशांनी शक्कल लढवत या प्रकरणात समेट घडवून आणली. मध्य प्रदेशातील देवास भागात पती आणि पत्नीच्या भांडणाची हि अनोखी कथा आहे.

त्याचे असे झाले कि , मध्य प्रदेशातील देवास भागात राहणारे  विमलराव यांनी बँकेच्या नोकरीतून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर मिळालेला पैसा विमलरावांनी आपल्या पत्नीच्या हाती सोपवला. इतकच नव्हे तर देवासमधलं राहते  घर आणि आपलं पेन्शनही विमलरावांनी बायकोच्या नावावर केली. एक दिवस विमलरावांना शेवेची भाजी खाण्याची इच्छा झाली. त्यांनी आपल्या पत्नीला शेवेची भाजी बनवण्यास सांगितली आणि दोघांमध्ये या क्षुल्लक कारणावरुन वाद झाला. यामुळे रागावलेल्या विमलराव यांनी पत्नीला न सांगता गृहत्याग केला. तो हि थोडा तितका नव्हे तब्ब्ल १७ वर्षे !!

दरम्यान आपले  घर सोडल्यानंतर विमलराव महाराष्ट्रात बुलडाणा जिल्ह्यातील मातोड गावात झोपडी बांधून राहू  लागले. काही कालावधीनंतर विमलरावांनी पेन्शनही आपल्या खात्यात वर्ग करुन घेतली. यानंतर हा मुद्दा कोर्टात गेला. जी पत्नी मला शेवेची भाजी देऊ शकत नाही, तिला मी पैसे का देऊ ?  असा प्रश्न उपस्थित करून विमलरावांनी कोर्टात आपली नाराजी बोलून दाखवली. पत्नी जर येथून पुढे आपल्याला शेवभाजी खाऊ घालण्याची साईबाबांसमोर शपथ घेणार असेल तर मी समेट करायला तयार असल्याचं विमलरावांनी सांगितलं. यानंतर न्यायाधीश गंगाचरण दुबे यांनी स्वतः पुढाकार घेत शेव आणायला सांगत, पत्नीला भाजी करुन देण्याचे आदेश दिले. इतकेच नव्हे तर दोघांनाही शिर्डीला जाण्यासाठी दीड हजार रुपयांची सोय करुन देत न्यायाधीशांनी दोघांमध्ये समेट घडवून आणला आणि हा १७ वर्षे चिमणरावांनी धरलेला अबोला सोडला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!