Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad : जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत समसमान मते मिळाल्याने निवडणूक प्रक्रिया स्थगित

Spread the love

औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील मतदान प्रक्रियेमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. दोन्ही गटाला समसमान मतदान पडल्याने प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. त्यानंतर शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार आणि शिवसैनिक समोरासमोर आल्याने मोठा गदारोळ निर्माण झाला.  दरम्यान वैधानिक पैच निर्माण झाल्याने जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक उद्या घेण्याचा  निर्णय प्रशासनाने घेतला आहे. भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार देवयानी डोणगावकर आणि शिवसेनेच्या उमेदवार मीनाताई शेळके यांच्यात हि लढत झाली.

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक होणार होती या निवडणुकीत प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी दोन्ही उमेदवारांना समान मध्ये मिळाल्यामुळे कायदेशीर पेचप्रसंग निर्माण झाला होता औरंगाबाद जिल्हा परिषदेत शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यामहा विकास आघाडीच्या तीन पक्षांची राज्यात महा विकास आघाडी होण्यापूर्वी पासूनच सत्ता आहे सत्ता स्थापन करण्यासाठी ३१ सदस्यांचे संख्याबळ आवश्यक आहेत औरंगाबाद जिल्हा परिषदेत भाजपकडे स्वतःचे २३ सदस्य असून त्यांना आठ सदस्य कमी पडत होते या आठ सदस्यांची जुळवाजुळव करण्यासाठी भाजप नेत्यांचे प्रयत्न चालू होते पाच सकाळी १० ते १२ या वेळेत दोन्ही पदांसाठी ही निवडणूक झाली.

अपक्ष उमेदवारी दाखल करणाऱ्या शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार देवयानी डोनगावकर यांची गाडी शिवसैनिकांनी अडवली. त्यामुळे  काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.  हि परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीमार करावा लागला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सेनेच्याच अध्यक्षा देवयानी डोनगावकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्यामुळे या निवडणुकीत रंगत निर्माण झाली.

शिवसेनेतून बंडखोरी करून देवयानी डोनगावकर यांनी अर्ज दाखल केल्याने भाजपने त्यांना मतदान करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे औरंगाबादमध्ये जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी अटीतटीची लढत झाली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापनेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांनी ऐतिहासिक आघाडी केल्यामुळे  स्थानिक स्वराज्य संस्थांतही राजकीय भूकंप होऊ लागले आहेत. तीन पक्षांची ताकद एकजूट होऊ लागल्याने भाजपसमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!