Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

गेल्या पाच वर्षांत देश मजबूत झाला आहे, त्याआधीचे अर्थव्यवस्थेचे संकट आमच्या सरकारने परतवून लावले : पंतप्रधान

Spread the love

दिल्लीतील विज्ञान भवनात ‘असोचेम’च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी  देशभर नागरिकत्व सुधारणा कायद्याला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर बोलताना म्हणाले कि , ‘देशाला संकटातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अर्थात, हे सगळं सोपं नाही. देशहिताचे निर्णय घेताना खूप काही सहन करावं लागतं. अनेक आरोप होतात. पण देशासाठी करावं लागतं’ .

‘सध्याचे  देशातील सरकार प्रत्येक वर्गाचं म्हणणे  ऐकून घेणारं आहे. आम्ही शेतकऱ्यांचे  ऐकतो, मजुरांचे  ऐकतो. व्यापाऱ्यांचे  ऐकतो आणि उद्योजकांचंही ऐकतो. त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्या सल्ल्यानुसार काम करण्याचा प्रयत्न करतो, पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचा मुद्दा अचानक आलेला नाही. मागील पाच वर्षांत देश मजबूत झाला आहे. त्याआधी देशाची अर्थव्यवस्था संकटात होती. आम्ही हे संकट परतावून लावले. त्यामुळं आपली अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरची होऊ शकते असा विश्वास निर्माण झाला आहे,’ असेही  मोदी म्हणाले.

या सभेला उपस्थित असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार ?  याकडे सर्वांचेच लक्ष लागले  होते. मोदी यांनी नागरिकत्व कायदा किंवा देशातील हिंसाचाराचा थेट उल्लेख न करता वर्तमान परिस्थितीवर अप्रत्यक्ष मत मांडताना मोदी पुढे म्हणाले कि , ‘देशाला संकटातून वाचवताना लोकांच्या क्रोधाचा सामना करावाच लागतो. आरोप सहन करावे लागतात. तरीही करावं लागतंच. ७० वर्षांच्या सवयी बदलायला वेळ लागणारच, पण देशासाठी करावं लागतं.  ‘असोचेम’नं आपल्या १०० वर्षांच्या वाटचालीत अनेक चढ-उतार पाहिले असतील. अनेकांनी या संस्थेचं नेतृत्व केलं असेल. ते सगळे अभिनंदनास पात्र आहेत,’ असेही मोदी म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!